ओसामाला शोधणाऱ्या श्वानाचा वंशज आता दिल्ली मेट्रोच्या सेवेत

सुमारे सहा महिन्यांच्या लाॅकडाऊनच्या कालावधीनंतर ७ सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहे. या दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी 'पोलो'हा श्वान रुजू होत आहे. खडतर प्रशिक्षणानंतर 'पोलो'ची ही पहिलीच नेमणूक आहे.
Polo a Belgian Malinois breed dog to Guard Delhi Metro
Polo a Belgian Malinois breed dog to Guard Delhi Metro

नवी दिल्ली : सुमारे सहा महिन्यांच्या लाॅकडाऊनच्या कालावधीनंतर  ७ सप्टेंबरपासून दिल्ली मेट्रो प्रवाशांच्या सेवेत पुन्हा रुजू होत आहे. या दिल्ली मेट्रोच्या सुरक्षेसाठी 'पोलो'हा श्वान रुजू होत आहे. खडतर प्रशिक्षणानंतर 'पोलो'ची ही पहिलीच नेमणूक आहे. 

हा श्वान साधासुधा नाही. अमेरिकन सेनेने पाकिस्तानातल्या अबोटाबाद येथे ९-११च्या हल्ल्यांचा सूत्रधार दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा केला. त्या वेळी या पथकासोबत असलेल्या प्रशिक्षित श्वानाच्या वंशावळीचा 'पोलो' हा वारसदार आहे. बेल्जियन मॅलिनोआ जातीचे श्वान हे 'सोल्जर डाॅग'म्हणून ओळखले जातात. याच जातीचा श्वान अमेरिकेने ओसामाला मारण्यासाठी हेलिकाॅप्टरमधून जे सैनिक पाठवले त्यांच्यासोबत होता. 

अमेरिकेचे सैनिक बेल्जिअन मॅलिनोआ जातीच्या 'कैरो' या श्वानाला बरोबर घेऊन गेले होते. 'पोलो' हा याच 'कैरो'च्या वंशावळीतला आहे. त्याला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) दिमतीला देण्यात आले आहे. दिल्ली मेट्रोसह देशातल्या विमानतळांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल पाहते. बेल्जियन मॅलिनोआ जातीचा श्वान राजधानीतल्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या सुरक्षेसाठी वापरली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. 'पोलो' हा वैशिष्ट्यपूर्ण श्वान असून त्याला हुंगणे, हल्ला करणे आणि रक्षण करणे असे तिन्ही प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. 

हा श्वान अन्य जातींपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्या माग काढण्याच्या आणि हल्ला करण्याच्या क्षमता अन्य श्वानांपेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत. हा ४० किलोमीटरपर्यंतचे अंतर चालू शकतो. अन्य श्वान ४ ते ७ किलोमीटरचे अंतर चालू शकतात, अशी माहिती त्याच्या हँडरलनी दिली आहे. 
(स्त्रोत - अंकूर शर्मा एएनआय न्यूज)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com