काँग्रेसवर निशाणा अन् प्रशांत किशोर यांचा गांधी परिवारापासून दुरावल्याचा संदेश
Gandhi Family and Prashant KishorFile Photo

काँग्रेसवर निशाणा अन् प्रशांत किशोर यांचा गांधी परिवारापासून दुरावल्याचा संदेश

प्रशांत किशोर यांनी थेट काँग्रेसच्या मूळ समस्येवरच केलेल्या ट्विटने ते गांधी परिवारापासून दुरावल्याचे संकेत मिळत आहेत.

नवी दिल्ली : राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi), राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियांका गांधींची (Priyanka Gandhi) काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती. ती भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात होती. परंतु, आता किशोर यांनी थेट काँग्रेसवरच निशाणा साधल्याने ते गांधी परिवारापासून दुरावल्याचे संकेत मिळत आहेत.

उत्तर प्रदेशात लखीमपूर खीरीत केंद्रीय मंत्र्याच्या मोटारीने शेतकऱ्यांना चिरडले होते. या घटनेने देशभरात जनक्षोभ उसळला आहे. या घटनेतील मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले होते. यावर किशोर यांनी ट्विट करीत काँग्रेसवरच निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, लखीमपूर खीरीसारख्या घटनेच्या माध्यमातून सगळ्यात जुन्या पक्षाच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष एकत्र येतील आणि त्यांची ताकद वाढेल, अशी लोकांची अपेक्षा आहे. दुर्दैवाने सगळ्यात जुन्या पक्षात अनेक जुन्या समस्या आहेत आणि संघटनात्मक कमकुवतपणा आहे. त्यावर कोणताच जलद उपाय नाही.

गांधी परिवारातील तिन्ही सदस्यांसोबत किशोर यांची जुलै महिन्यात बैठक झाली होती. आधीही अनेक वेळा अशा बैठका झाल्या होत्या. किशोर यांनी काँग्रेसमध्ये रणनीतीकार अशी भूमिका देण्यावर प्रस्ताव समोर आला होता. ते काँग्रेसमध्ये प्रवेश करुन पक्षाचे अधिकृत रणनीतीकार म्हणून काम पाहतील, अशी शक्यता व्यक्त झाली होती. किशोर यांची गांधी परिवारासोबतची बैठक ही केवळ पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांपुरती मर्यादित नव्हती. काँग्रेस पक्ष 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी करू लागला आहे. यात किशोर हे महत्वाची भूमिका बजावतील, असेही वाटत होते.

Gandhi Family and Prashant Kishor
मुलगा नेपाळमध्ये पळाला? अखेर केंद्रीय मंत्र्यांनीच केला खुलासा

पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांत एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत किशोर रणनीतीकार म्हणून लक्षवेधी कामगिरी केली होती. बंगालमध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींची सत्ता आणून भाजपला धूळ चारली होती. संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या आणि भाजपने अतिशय प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकीत ममतांचा विजय झाला होता. किशोर यांनी तमिळनाडूत द्रमुकचे एम.के.स्टॅलिन यांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

Gandhi Family and Prashant Kishor
सर्वोच्च न्यायालयानं सुनावल्यानंतरही उत्तर प्रदेश पोलिसांचे पहिले पाढे पंचावन्न

बंगाल आणि तमिळनाडूतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून निवृत्त होण्याची घोषणा किशोर यांनी केली होती. परंतु, त्यांची आयपॅक ही सल्लागार कंपनी अनेक पक्षांचे काम करीत आहे. त्यावेळी ते म्हणाले होते की, मला आता हे काम करायचे नाही. मी खूप काम केले आहे. आता मी विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आयुष्यात मी आता वेगळे काही तरी करेन. पुढे काय करायचे यावर मी विचार करतोय.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in