पोलीस मंत्रिपुत्राला घटनास्थळी घेऊन गेले अन् दाखवलं कसं शेतकऱ्यांना चिरडलं!

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलीस मंत्रिपुत्राला घटनास्थळी घेऊन गेले अन् दाखवलं कसं शेतकऱ्यांना चिरडलं!
Ashish Mishra

लखीमपूर खीरी : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आली असून, त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलीस आज आशिषसह त्याचा निकवटर्तीय अंकित दास घटनास्थळी घेऊन गेले होते.

या प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. आशिष मिश्रासह लव कुश, आशिष पांडे आणि अंकित दास या चौघांना अटक झाली आहे. आशिषने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. याचबरोबर आशिष पांडेचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. पोलिसांनी आज आशिष आणि अंकित यांना घटनास्थळी नेले. त्यादिवशी नेमके काय घडले हे त्यांच्याकडून जाणून घेण्यात आले.

लखीमपूर खीरीत घटना घडली तेथील घटनाक्रम तपासण्यासाठी पोलिसांनी आशिष आणि दुसऱ्या आरोपीला तेथे नेले होते. तेथे पोलिसांच्या कारच्या साहाय्याने 3 ऑक्टोबरच्या घटनेचे प्रात्यक्षिक दाखवले. पोलिसांच्या कार अतिशय भरधाव वेगाने जाऊन डमींना चिरडत असल्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. याचबरोबर त्यावेळचा घटनाक्रमही पोलिसांनी आशिषकडून तपासला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Ashish Mishra
दिवाळीच्या तोंडावर वाहनचालकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलं!

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरापासून शेतकरी शांततामय मार्गाने आंदोलन करीत आहेत. लखीमपूर खीरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हे 3 ऑक्टोबरला गेले होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्य मंत्री मिश्रा यांचा मुलगा आशिष आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली होती. याचवेळी ही घटना घडली होती. यात 8 जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील 4 शेतकरी आहेत.

Ashish Mishra
पेट्रोल, डिझेल आणखी महागणार; चालू महिन्यात बारावी दरवाढ

मिश्रा आणि मौर्य यांच्या मोटारींचा ताफा 3 ऑक्टोबरला तिकोनिया चौकातून जात असताना त्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी धावले. त्याचवेळी ताफ्यातील दोन मोटारी त्या गर्दीत घुसल्या. त्यामुळे अनेक शेतकरी चिरडले गेले. ही घटना पाहताच शेतकरी आणखी संतप्त झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्या दोन्ही गाड्यांना आग लावल्याचे सांगण्यात येते. या घटनेत एकूण आठ जणांचा मृत्यू झाला होता.

Related Stories

No stories found.