PNB Scam : फरार मेहुल चोक्सीला अपहरणाची भीती!

मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) डोमिनिका येथे २३ मे रोजी अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. तो सध्या अँटिग्वा येथे आहे.
 Mehul Choksi
Mehul Choksisarkarnama

नवी-दिल्ली : पंजाब नॅशनल बॅक (PNB Scam) गैरव्यवहारातील आरोपी हिऱ्यांचा व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ''पुन्हा एकदा माझे अपहरण केले जाईल,'' अशी भीती मेहुल चोक्सीनं व्यक्त केली आहे.

''आपले अपहरण करुन गुआना येथे आपल्याला घेऊन जातील,'' अशी शंका त्याने व्यक्त केली आहे. 'एएनआय' (ANI)ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ही शंका व्यक्त केली आहे. मेहुल चोक्सीला डोमिनिका येथे २३ मे रोजी अवैधरित्या प्रवेश केल्याप्रकरणी अटक केली होती. तो सध्या अँटिग्वा येथे आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी आपले अपहरण करुन डोमिनिका येथेआणल्याचा दावा चोक्सीने त्यावेळी केला होता.

'मी सध्या अँटिग्वामधील माझ्या घरात असून प्रकृती नीट नसल्याने मी कुठेही जाऊ शकत नाही. भारतीय अधिकाऱ्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे माझी प्रकृती अजूनच खालावली,'' असा आरोपही मेहुल चोक्सीने केला आहे.

मेहुल चोक्सी म्हणाला, ''मागील काही महिन्यांमध्ये बसलेले मानसिक धक्के, सतत मनात असलेली भीती मला सध्या मदतीची गरज आहे. डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे मी घराबाहेर पाय ठेवू शकत नाही आणि प्रकाशझोतात येण्यापासून स्वत:ला दूर ठेवतो. माझ्या प्रकृतीमुळे मला काही करायला जमत नाही. माझे वकील अँटिग्वा आणि डोमनिकामध्ये केस लढत असून न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे’

 Mehul Choksi
आठ महिन्यांनंतर परमबीर सिंग-सचिन वाझे समोरासमोर

मेहुल चोक्सीला अँटिग्वा येथून भारतीय तपास यंत्रणांनी एजंटामार्फेत त्याचे अपहरण केले होते. त्याला २३ मे रोजी जबरदस्तीने डोमिनिका येथे घेऊन गेले होते. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी सांगितले की चोक्सी यांन वैद्यकीय कारणावरुन जामिन मिळाला आहे. त्यासाठी त्याने २ लाख २५ हजार रुपये न्यायालयात जमा केले आहेत.

त्याचे दुसरे वकील माइकल पोलक म्हणाले, ''मेहुल चोक्सी काही आठवड्यापासून खूप आजारी आहे. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना घरी राहणे गरजेचे होते, त्यामुळे ते उपचार करु शकतील अन् कुंटुबालाही मदत करु शकतील,'' सीबीआय (CBI) आणि ईडीने (ED) मेहुल चोक्साला फरार घोषित केले आहे. पंजाब नॅशनल बॅकेत त्याने सुमारे १४ हजार कोटी रुपयांचा अपहार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com