मोदींनी सव्वालाखांची शाल परिधान करुन केली कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा

नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) शुक्रवारी जी शाल परिधान केली होती तिची किमंत सुमारे सव्वा लाख रुपये असल्याची माहिती आहे.

मोदींनी सव्वालाखांची शाल परिधान करुन केली कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा
Narendra Modisarkarnama

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाइफस्टाइल नेहमीच चर्चेत असते. मोदी वापरत असलेले लाखो रुपयांचे पेन, घड्याळ, कोट, सूट आदींची चर्चा समाजमाध्यमांवर रंगत असते, पण शुक्रवारी मोदींनी तीन कृषी कायदे मागे (Agriculture Act) घेण्याची घोषणा केली तेव्हा त्यांनी परिधान केलेली शाल किती रुपयांची होती, याची चर्चा सध्या समाजमाध्यमांवर सुरु आहे.

विशेष आकर्षक वस्तूंसोबतच मोदींना सुंदर डिझाईनची शाल परिधान करण्याची आवड आहे. शुक्रवारी मोदींनी (Narendra Modi) जी शाल परिधान केली होती तिची किमंत सुमारे सव्वा लाख रुपये असल्याची माहिती आहे. ही शाल काश्मीर येथे तयार करण्यात आली आहे. हस्तकारागीरांनी ती बनविली आहे.

काश्मीरी शाल
काश्मीरी शाल सरकारनामा

७० हून अधिक लाकडी सुईंचा वापर करुन ही शाल बनविण्यात येते. यात वापरण्यात येणारा धागा हा मजबूत असतो. शालच्या विविध प्रकारामध्ये ही शाल सर्वात्तम मानली जाते. ही शाल बनविण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागतो. गुणवत्ता आणि हस्तकला यांचे उत्तम उदाहरण म्हणजे ही शाल आहे. धागा-धागांच्या माध्यमातून कोडित पर्टननुसार या शालचे विणकाम केलं जातं.

ही शाल दररोज फक्त एक इंचच विणली जाते. त्यामुळे तिला सहा महिन्याचा कालावधी लागतो. लंडन येथील विक्टोरिया एंड अल्बर्ट म्यूजियम, पॅरिसमधील मुसी डेस आर्ट्स डेकोराटिफ्स आणि मेट्रोपॉलिटन म्यूजियम ऑफ आर्ट, न्यूयॉर्क येथील इस्लामी कला विभाग असा जगभरातील प्रसिद्ध संग्रहालयात या शालला मानाचे स्थान देण्यात आले आहे.

Narendra Modi
"आताही अंध भक्त बोलतील, काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक"; शिवसेनेचा टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) यांनी वादग्रस्त तीनही कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याची मोठी घोषणा शुक्रवारी केली. ''सामान्य शेतकऱ्यांना आम्ही हे कायदे समजून सांगण्यात कमी पडलो,'' असे म्हणत मोदी शेतकऱ्यांच्या आंदोलनासमोर झुकले. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलून संसदेत बळाच्या जोरावर संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या फायद्यांचा फायदा पुन्हा एकदा वाचून दाखवले.

''तीन कृषी कायदे (Agriculture Laws) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद सत्रात हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल., या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू,'' असे मोदी यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in