निवडणुका तर होतच राहतील पण...! पंतप्रधान मोदींनी केली खासदारांना विनंती

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अर्थमंत्र्यांकडून मंगळवारी बजेट सादर केलं जाणार आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) आजपासून (ता. 31) सुरू होत आहे. हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच हे अधिवेशनही गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेगॅसससह (Pegasus), चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन अशा मुद्दांवर विरोधकांकडून मोदी सरकारला घेरले जाऊ शकते. पण त्याआधी संसदेत दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व पक्षांतील खासदारांना आवाहन केलं आहे.

माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात होत आहे. देशभरातील सर्व आदरणीय खासदारांचे या अधिवेशनात स्वागत करतो. आजच्या जागतिक स्थितीत भारतासाठी खूप संधी आहेत. जगातील फक्त भारताची आर्थिक स्थिती, भारतातील लसीकरण अभियान, स्वदेशी लस यांमुळे संपूर्ण जगात एक विश्वास निर्माण करत आहे.

Narendra Modi
धक्कादायक : पोलीस उपनिरीक्षकावर बलात्कार; भाजप नेत्यासह बारा जणांवर आरोप

या बजेट सत्रातील खासदारांच्या चर्चेचे मुद्दे, मोकळ्या मनाने केलेली चर्चा ही जागतिक प्रभावासाठी महत्वपूर्ण संधी बनू शकते. मी आशा करतो की, सर्व सदस्य, सर्व राजकीय पक्ष खुल्या मनाने उत्तम चर्चा करून देशाला प्रगतीच्या मार्गाने नेण्यासाठी, त्यात गती आणण्यासाठी मदत करतील. सततच्या निवडणुकांमुळे अधिवेशन आणि चर्चाही प्रभावित होतात, हे खरं आहे. पण मी सर्व सदस्यांना प्रार्थना करतो, निवडणुका तर होतच राहतील, पण आपण संसदेत हे बजेट अधिवेशन फलदायी बनवू, अशी विनंती पंतप्रधान मोदींनी केली.

हे बजेट पूर्ण वर्षभराचे असल्याने महत्वाचे असते. आम्ही पूर्ण प्रतिबध्दतेने या बजेट अधिवेशनाला जेवढे फलदायी बनवू, त्यानुसार येणारे संपूर्ण वर्ष आपल्याला नव्या आर्थिक उंचीवर घेऊन जाण्यासाठी नवी संधी असेल. मुक्त चर्चा व्हावी, मानवीय संवेदनांनी भरलेली चर्चा व्हावी, चांगल्या हेतूने चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही मोदींनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, अधिवेशनाच्या सुरूवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हे संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्तपणे संबोधित करतील. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharamana) या वर्ष 2021-22 चे आर्थिक सर्वेक्षण सादर करतील. उद्या (ता. 1 फेब्रुवारी) अर्थमंत्री 2022-23 वर्षाचे बजेट सादर करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com