आता बास, दोनदा पंतप्रधान झालात! 'पॉवरफुल' नेत्याचा सल्ला अन् मोदींचा गौप्यस्फोट

माझं स्वप्न कल्याणकारी योजनांचा शंभर टक्के फायदा लोकांपर्यंत पोहचवणे हे आहे, असं मोदी यांनी बोलताना सांगितलं.
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील एका बड्या नेत्यानं सल्ला दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. देशानं तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला आणखी काय हवं, असा सल्ला या नेत्यानं मोदींना दिला होता. पण मोदींनी या नेत्याचं नाव सांगितलं नाही. (PM Narendra Modi Latest Marathi News)

कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, एकदा एक ज्येष्ठ नेते मला भेटले. ते राजकीयदृष्ट्या सतत आमच्या विरोधात असतात. पण मी त्यांचा आदर करतो. काही मुद्यांवर ते निराश होते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते. भेटीत ते मला म्हणाले, देशाने तुम्हाला दोनदा पंतप्रधान बनवलं, त्यामुळं आता आणखी काय हवं?

PM Narendra Modi Latest Marathi News
महाराष्ट्र 'त्यांच्या' हातात जाऊ द्यायचा का, हे ठरवण्याची वेळ! हरि नरके विरोधकांवर बरसले

या नेत्याचं मत असं होतं की, जर कोणी दोनवेळा पंतप्रधान बनले असेल तर त्यांनी सर्वकाही मिळवलं, असं मोदी यांनी पुढे बोलताना सांगितले. माझं स्वप्न कल्याणकारी योजनांचा शंभर टक्के फायदा लोकांपर्यंत पोहचवणे हे आहे. त्यांना माहिती नाही की, मोदी कोणत्या मातीचे बनले आहेत. गुजराच्या भूमीने मला बनवले आहे, असंही मोदी म्हणाले.

जे काही झालं ते झालं, आता मला आराम करायला हवा, या गोष्टींवर माझा विश्वास नाही. तुम्हाला मला आठ वर्षांपूर्वी गुजरातमधून दिल्लीत पाठवले आहे. ही आठ वर्षेला सेवा, गरीबांचे कल्याण आणि सुशासन याला वाहून घेतली असल्याचे मोदींनी सांगितले.

PM Narendra Modi Latest Marathi News
हाजिर हो! दरेकरांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

आठ वर्षांच्या महत्वपूर्ण संधीमुळे पुन्हा एक कंबर कसून सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या प्रयत्नातून पुढे जायचे आहे. गरजवंतांना, प्रत्येकाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुन्हा जोमाने प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे योजना शंभर टक्के लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारी यंत्रणेलाही त्याची सवय करून घ्यावी लागेल, असं मोदींनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com