लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्या; पंतप्रधान मोदींनी साधला माध्यमांशी संवाद

आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाआधी पंतप्रधानांचा माध्यमांशी संवाद...
PM Narendra Modi Latest Marathi News
PM Narendra Modi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : संसदेचे (Parliament) पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. आजच राष्ट्रपती पदाचीही निवडणूक असल्याने मोदी सरकार व विरोधकांसाठीही आजचा दिवस महत्वाचा आहे. राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या उमेदवार आहेत. तर यशवंत सिन्हा हे युपीएकडून लढत आहेत. पण सद्यस्थिती मुर्मू यांचं पारडं जड आहे. यापार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशनही होत असून त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. (PM Narendra Modi Latest Marathi News)

माध्यमांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची आठवण करून देत सर्व खासदारांना लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. आगामी 25 वर्षांनी देश जेव्हा शताब्दी साजरी करेल, त्यावेळी आपली 25 वर्षांचा प्रवास कसा असेल, किती वेगाने पुढे जाऊ, याचा संकल्प करण्याचा हा एक कालखंड आहे.

PM Narendra Modi Latest Marathi News
'जनमत आपल्या विरोधात...; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली शरद पवारांची आठवण

त्याप्रती समर्पित होऊन देशाला दाखवून देणे आवश्यक आहे की, संसद देशाचे नेतृत्व करेल, देशात नवी ऊर्जा भरण्यासाठी निमित्त बनेल. त्याअर्थाने हे अधिवेशन खूप महत्वाचे आहे. याच काळात राष्ट्रपती व उपराष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. आज मतदान आहे, त्यासाठीही हे अधिवेशन महत्वाचे आहे. या काळात देशाला नवे राष्ट्रपती व नव्या उपराष्ट्रपतींचे मार्गदर्शन मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

आम्ही नेहमी संसदेत संवादाचे एक सक्षम माध्यम मानतो. तीर्थक्षेत्र मानतो. जिथे मोकळ्या मनाने संवाद व्हावेत, गरज भासल्यास वादविवाह व्हावेत, उत्तमप्रकारे विश्लेषण व्हावे, जेणेकरून धोरणे आणि निर्णयांमध्ये सकारात्मक योगदान देता येईल, असंही पंतप्रधान यांनी सांगितले.

सर्व खासदारांनी उत्तम चर्चा आणि सभागृहाला आपण जेवढे खेळीमेळीचे बनवू यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सर्वांच्या प्रयत्नातूनच लोकशाही पुढे जाते. सर्वांच्या प्रयत्नातूनच संसद चालते. चांगले निर्णय घेतले जाऊ शकतात. त्यामुळे संसदेची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण या अधिवेशनाचा राष्ट्रहितासाठी सर्वाधिक उपयोग करावा. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले, आयुष्यभर तुरूंगात राहिले, अनेक शहीद झाले. त्यांची स्वप्न विचारात घेऊन संसदेचा सकारात्मक उपयोग व्हावा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com