पंतप्रधान मोदींकडून वाढदिवशी आईला मोठं गिप्ट !

'हिराबेन शताब्दीकडे वाटचाल करत असताना आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे.
pm narendra modi, heeraben modi
pm narendra modi, heeraben modisarkarnama

गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांच्या आई हिराबेन मोदी (heeraben modi) या शनिवारी (ता. १९) १०० व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्ताने नरेंद्र मोदी हे आपल्या आईची भेट घेणार आहेत.

हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांनी वडनगरमध्येही मोठा उत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्यासह इतर नामवंत कलाकारही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन या आपल्या धाकट्या मुलासोबत (पंकज मोदी) गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात.

pm narendra modi, heeraben modi
भाजपच्या नेत्या अपर्णा यादव यांना जीवे मारण्याची धमकी

हिराबेन यांचा शंभरावा वाढदिवस त्यांच्या घरी गांधीनगर येथे साजर करण्यात येत येणार असल्याची माहिती त्यांच्य कुटुबियांकडून देण्यात आली आहे. हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचं नाव दिलं जाणार आहे, अशी माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं याबाबतचे वृत्त दिल आहे.

“हिराबेन यांच्या वाढदिवसानिमित्त रायसन पेट्रोल पंपाजवळील 80 मीटर रस्त्याला पूज्य हिराबेन मार्ग असे नाव दिले जाईल. त्याचे नाव येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हाच यामागचा उद्देश आहे," असे गांधीनगरचे महापौर हितेश मकवाना यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. यावेळी वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. त्याशिवाय पीएम मोदी पावागढमध्ये 'काली माता' मंदिरात ध्वजारोहणही करणार आहेत.

'हिराबेन शताब्दीकडे वाटचाल करत असताना आम्ही वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात नवचंडी यज्ञ आणि सुंदरकांड पठणाचे आयोजन केले आहे. यावेळी मंदिरात संगीत संध्याचेही आयोजन करण्यात आले आहे, असे पंतप्रधानाचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी सांगितले.गांधीनगर येथील रायसन पेट्रोल पंपापासून 60 मीटर रस्त्याचे ‘पूज्य हिरा मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com