वाराणसीत दिवाळी! मोदींच्या ३३९ कोटींच्या ड्रीम प्रोजेक्टचे लोकार्पण

कोरोना संकटकाळातही हे काम वेळेत पुर्ण करण्यात आले आहे.
PM Narendra Modi in Kashi Dham varanasi
PM Narendra Modi in Kashi Dham varanasiSarkarnama

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्यापासून दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर जाणार आहेत. आपल्या मतदारसंघाच्या या दौऱ्यात मोदी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे लोकार्पण करणार आहेत. या ड्रिम प्रोजेक्टचा उद्घाटन सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने अक्षरशः कंबर कसली आहे. या सोहळ्यामुळे वाराणसी-काशी विश्वेश्वरमध्ये पुन्हा एकदा दिवाळीला सुरुवात झाली आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला अनेक संत-महात्मे, धर्मचार्य, आध्यात्मिक गुरु, भाजपशासित १२ राज्यांचे मुख्यमंत्री, ९ उप-मुख्यमंत्री, भाजपचे विविध राज्यांमधील विरोधी पक्ष नेते उपस्थित राहणार आहेत. एकूण ३३९ कोटी रुपये या ड्रिम प्रोजेक्टसाठी खर्च करण्यात आले आहेत.

पंतप्रधान मोदींचा हा ड्रिम प्रोजेक्ट म्हणजे, श्रीकाशी विश्वनाथ धाम. (Kashi Dham varanasi) या धामचे तब्बल २४४ वर्षानंतर नुतनीकरण करण्यात आले आहे. जवळपास ५४ हजार चौरस फुटांमधील या धामचे पंतप्रधान मोदींनी ८ मार्च २०१९ ला भूमिपूजन केले होते. त्यानंतर केवळ ३३ महिने ४ दिवसात या धामचे बांधकाम पुर्ण करण्यात आले आहे. २०२१ अखेर हे काम पुर्ण करणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे कोरोना संकटकाळातही हे काम वेळेत पुर्ण करण्यात आले आहे.

Kashi Dham varanasi
Kashi Dham varanasiTwitter

या कामामुळे विश्वनाथ मंदिर ते गंगा नदी अशा अरुंद गल्ल्यांनी व्यापलेल्या परिसरात आता सुटसुटीतपणा येणार आहे. भाविकांसाठी २३ नव्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. तसेच धाम आता गंगा नदी सोबत थेट जोडण्यात आले आहे. ११९४ ते १६६९ या ५ शतकांच्या काळात श्रीकाशी विश्वनाथ मंदिराला अनेकदा क्षती पोहचवण्यात आली होती. त्यानंतर १७७७ ते १७८० या वर्षांमध्ये मराठा साम्राज्याच्या अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात काशी विश्वेश्वर मंदिर आणि परिसराचा कायापालट करण्यात येत आहे.

Kashi Dham varanasi
Kashi Dham varanasiTwitter

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com