यूपीची निवडणूक मोदी-शहांनी गंभीरतेने घेतलीय..अधिकाऱ्यांना दिलयं टार्गेट

नरेंद्र मोदी (pm Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीची (Uttar Pradesh elections) सुत्रे हाती घेतली आहे.
narendra modi, amit shah
narendra modi, amit shah sarkarnama

नवी दिल्ली : उत्तरप्रदेश निवडणुकीला सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सत्ताधारी भाजपला उत्तरप्रदेशाची निवडणुक महत्वाची आहे. त्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)यांनी उत्तरप्रदेश निवडणुकीची (Uttar Pradesh elections) सुत्रे हाती घेतली आहे. येत्या काही दिवसात दोन्ही नेत्यांचा दैारा आहे. विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने मोदी, शहा यांच्या जाहीर सभाही होणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा (pm Narendra Modi) पहिला दौरा १६ नोव्हेंबरला आहे. पूर्वांचल एक्प्रेसवे च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी झाशीच्या ऐतिहासिक किल्ल्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त होणाऱ्या खास कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान बुंदेलखंड विभागातील अनेक विकास प्रकल्पांची पाहणी करणार आहेत. २५ तारखेला मोदी नोएडा येथे जेवर विमानतळाचे भूमीपूजन करणार आहेत.

narendra modi, amit shah
परमबीर सिंह प्रकरणात CIDची पहिलीच कारवाई ; 'त्या' दोन पोलिस अधिकाऱ्यांना अटक

देशातील पोलिस महासंचालकांची बैठक यावेळी दिल्ली ऐवजी लखनौ येथे आयोजित करण्यात आली आहे. 20 ते 22 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या या परिषदेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत. गृहमंत्री अमित शहा हे १२ व १३ नोव्हेंबर रोजी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते आझमगड, जौनपूर व बस्ती विभागांतील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान मोदी व शहा यांच्या दौऱ्याबाबत सुरक्षेच्या कारणांमुळे गुप्तता पाळली जात आहे. मात्र मोदी व शहा यांचे नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील अनेक कार्यक्रमांना संबोधित करतील. मोदींच्या दैाऱ्याचा झंझावात डिसेंबरनंतर सुरू होईल व सर्वाधिक जाहीर सभा ते अर्थात उत्तर प्रदेशात घेतील हे भाजपने अधोरेखित

केले आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यावर दोन्ही नेते उत्तर प्रदेशासह पंजाब, उत्तराखंड व गौवा येथेही दौरे करणार आहेत.

केवळ नोव्हेंबर महिन्याच्या उर्वरीत काळात चार वेळा उत्तर प्रदेशात स्वतः जातील. पूर्वांचल एक्प्रेस वे व जेवरमधील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासह किमान 1 लाख कोटी रूपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रत्येक योजनेसाठी मोदी सरकारने काटेकोर डेडलाईन आखून दिली असून वेळेत काम पूर्ण न झाल्यास किंवा दर्जात काही खोट आढळल्यास साऱ्या संबंधितांवर कारवाई होणार आहे. यादृष्टीने मंत्रालयात तयार होणाऱ्या मूळ प्रोजेक्ट फाईलच्या रचनेतही लक्षणीय सुधारणा-बदल करण्यात येणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com