"सशक्त, समृद्ध आणि स्वस्थ भारताचा पाया" : PM मोदींचा व्यायामाचा व्हिडीओ व्हायरल

Pm Narendra Modi exercise in Meerut : पंतप्रधान मोदींचा जीममधील व्यायाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल...
Pm Narendra Modi exercise in Meerut  

Pm Narendra Modi exercise in Meerut  

Sarkarnama

मेरठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. मेरठमध्ये त्यांनी आज मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. मात्र याआधी त्यांनी मेरठमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भेट दिली. यावेळी मोदींनी जीमची पाहणी केली आणि चक्क व्यायामसुद्धा केला. पंतप्रधान मोदींचा जीममधील व्यायाम (Pm Narendra Modi exercise in Meerut  ) करतानाचा व्हिडिओ संबित पात्रा (Sambit Patra) यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत संबित पात्रा यांनी म्हटले की, सशक्त, समृद्ध आणि स्वस्थ भारताचा पाया आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi) म्हणाले, पूर्वी कोणी खेळाडू असल्याचे सांगितल्यास, लोक काम काय करता विचारायचे? केवळ सैन्यात आणि पोलिसात जाण्यासाठीच खेळाडू होतात, असा समज होता. लोकांमध्ये खेळाबद्दलचा आदर नसल्यामुळे खेळाडूंना उपेक्षेला सामोरे जावे लागले. मात्र २०१४ नंतर ही परिस्थिती बदलली असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. २०१४ नंतर खेळाडूंना सगळी संसाधने, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण, परदेशातील ओळख आणि निवडीतील पारदर्शकता अशी शस्त्रे देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तरप्रदेशमध्ये निवडणुकांची लगबग सुरु झाली आहे. या वर्षात होत असलेल्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपसह काँग्रेस आणि समाजवादी पक्षांनेही याठिकाणी संपुर्ण ताकदीनिशी उतरले आहेत. याच निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही उत्तरप्रदेश दौऱ्यात वाढ झाली असून आचारसंहितेपुर्वी उद्घाटनांचा आणि लोकार्पण सोहळ्याचा धडका सुरु आहे. पंतप्रधान मोदींनी मागच्या महिन्यात काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोअरच्या लोकार्पण केल्यानंतर त्यांनी आज मेरठमध्ये मेजर ध्यानचंद क्रिडा विद्यापीठाची पायाभरणी केली.

<div class="paragraphs"><p>Pm Narendra Modi exercise in Meerut&nbsp;&nbsp;</p></div>
CDS रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी पुर्ण; कशामुळे झाला अपघात?

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी तब्बल तीन तास मेरठमध्ये होते. दुपारी १ ते ३ या वेळेत मेरठमधील सलावा गावाच्या परिसरात मेजर ध्यानचंद क्रिडा विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा पार पडला. या पायाभरणी सोहळ्यानंतर पंतप्रधानांनी काही खेळाडूंशीही संवाद साधला. कार्यक्रम स्थळाला स्टेडियमसारखे स्वरूप देण्यात आले होते. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि जवळपासच्या जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.

पंतप्रधान कार्यालयाने अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, क्रिडा विद्यापीठाच्या पायाभरणी सोहळ्याला राज्यातील २५ जिल्ह्यांमधील १६ हजार ८५० खेळाडूंना आमंत्रण देण्यात आले होते. हे विद्यापीठ तयार करण्यासाठी सुमारे ७०० कोटी रुपये खर्च येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com