पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा; देशाला दिली 'वीर बाल दिना'ची भेट

शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

नवी दिल्ली : शिखांचे दहावे गुरू, गुरू गोविंद सिंग (Guru Govind Singh) यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी (ता. 9) मोठी घोषणा केली आहे. यंदापासून ता. 26 डिसेंबर हा दिवस देशात 'वीर बाल दिन' (Veer Baal Diwas) म्हणून साजरा केला जाणार आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या धाडसाला आणि त्यांच्या न्यायाच्या शोधाला ही समर्पक श्रद्धांजली असेल, असं मोदींनी म्हटलं आहे.

गुरू गोविंद सिंग यांची जयंती देशात प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. याचेच औचित्य साधत पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन (ता. 14 नोव्हेंबर) हा देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आता ता. 26 डिसेंबर या दिवशी वीर बाल दिन साजरा केला जाणार आहे. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या स्मृतीनिमित्त या दिवसाची घोषणा करण्यात आली आहे.

PM Narendra Modi
भाजपच्या पराभवासाठी ममतांनी टाकले फासे; मोठी राजकीय उलथापालथ होणार?

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. आजच्या प्रकाश पर्वानिमित्त ही घोषणा करताना मला अभिमान वाटत आहे. 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाईल. गुरू गोविंद सिंग यांच्या मुलांच्या धाडसाला आणि त्यांच्या न्यायाच्या शोधाला ही समर्पक श्रद्धांजली असेल. साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना याच दिवशी भिंतीत जिवंत गाडले होते. या दोन महात्म्यांनी धर्माच्या उदात्त तत्त्वांपासून विचलित होण्याऐवजी मृत्यूला प्राधान्य दिले, असं मोदींनी म्हटलं होतं.

माता गुजरी, श्री गुरु गोविंद सिंग जी आणि चार साहिबजादे यांचे शौर्य आणि आदर्श लाखो लोकांना शक्ती देतात. ते कधीही अन्यायापुढे झुकले नाहीत. त्यांनी सर्वसमावेशक आणि सामंजस्यपूर्ण जगाची कल्पना केली. त्यांच्याबद्दल अधिकाधिक लोकांना माहिती मिळणे ही काळाची गरज आहे, अशी भावना मोदींनी ट्विटमध्ये व्यक्त केली आहे.

का साजरा केला जाणार वीर बाल दिन?

डिसेंबर 1704 मध्ये गुरू गोविंद सिंग यांना मुघलांशी लढताना चमकौर गढी येथे जावे लागले होते. सरसा नदी पार करताना त्यांची मुलं जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्यासोबत होती. पण गुरू गोविंद सिंग याच्यापासून ते वेगळे झाले. दोघांना मुघलांनी पकडून इस्माम धर्म स्वीकारण्यास सांगितले. पण त्यांनी नकार दिल्याने दोघांना जिवंत भिंतीत गाडण्यात आले. हा दिवस होता 26 डिसेंबर. गुरू गोविंद सिंग यांच्या या दोन्ही मुलांचा त्याग आणि साहसासाठी हा दिवस बाल वीर दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in