modi- arun jaitely
modi- arun jaitely

"मज तुझी आठवण येते...!' : अरुण जेटलींना मोदींकडून आदरांजली 

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत अरुण जेटली यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त जागविल्या आठवणी

नवी दिल्ली : राज्यसभेचे माजी सभागृहनेते व देशाचे माजी अर्थ, पर्यावरण, संरक्षण व माहिती-प्रसारणमंत्री व वरिष्ठ भाजप नेते अरूण जेटली यांना त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी आज देशभरात आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, "" मला माझ्या मित्राची खूप आठवण येते,'' अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनीही जेटलींबरोबरच्या मैत्रीला उजाळा दिला. 

जेटली यांच्या स्मृतीनिमित्त भाजपच्या वतीने ठिकठिकाणी रक्तदान शिबीरे, अन्नदान आदी उपक्रम राबविण्यात आले. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत होऊनही मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात अर्थ व संरक्षण यासारखी अत्यंत महत्वाची पदे सांभाळणारे जेटली यांची प्रकृती 2018 येता येता तोळामासा झाली. त्यामुळे त्यांनी 2019 मधील निवडणुकीनंतर आपण टीम मोदीचे सदस्य नसू असे स्वतः जाहीर केले. मात्र मागील वर्षी लोकसभा निकाल लागण्याच्या आसपास स्वतः मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी दीर्घ चर्चा केली होती.

पंतप्रधानांनी म्हटले की "मागच्या वर्षी याच दिवशी आम्ही आमच्या अरूण जेटली यांना गमावले होते. मला माझ्या या मित्राची फार आठवण येते. त्यांनी अतिशय कर्मठतेने देशसेवा केली. त्यांचा हजरजबाबीपणा, संसदीय वक्तृत्व, बुध्दिमत्ता, कायद्याचे सखोल ज्ञान व शानदार व्यक्तिमत्वाचे अनेक भोक्ते होते.'' जवाहरलाल नेहरू क्रीडागारात झालेल्या जेटली यांच्या शोकसभेतील भाषणाचा अंशही मोदी यांनी ट्‌विटरवर उपलब्ध करून दिला आहे.

नायडू यांनी जेटली यांच्या बालपणातील (1957 चा ) एक दुर्मिळ फोटो ट्‌विटवर उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी दोघांच्याही खाद्यप्रेमाच्या आठवणी जागविताना म्हटले की पक्षाच्या कामासाठी जेटलींसह आम्ही देघे जेव्हा कोणत्या राज्यात जात असू तेव्हा त्या शहरातील उत्कृष्ट खाद्यपदार्थ मिळणाऱ्या रेस्टॉरंट व हॉटेलची माहिती अवश्‍य घेत असू. संसदीय मर्यादांबाबत त्यांना जी श्रध्दा होती त्यामुळे ते महान संसदपटू बनले. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांच्यातील बहुआयामी व्यक्तिमतव्‌ विकसित झाले. 

गृहमंत्री अमित शहा ः  भारतीय राजकारणात ज्यांना तोड नाही असे एक कुशल राजकारणी, विपुल वक्ते व महान माणूस. 
भाजपाध्यक्ष जे पी नड्डा : प्रखर नेते, विचारक, कायदेपंडित व पद्मभूषण ने सन्मानित झालेले जेटली यांच्या अवेळी जाण्याने मोठी भाजपचा प्रमुख रणनीतीकार हरपला. ते त्यांच्या जनकल्याणकारी योजनांतील अप्रतिम योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com