मोदींच्या सुरक्षेत चुक हा पूर्वनियोजित कट ; किरण बेदींचा गंभीर आरोप

''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चुक ही पूर्वनियोजित कट होता,'' असा गंभीर आरोप किरण बेदी (Kiran Bedi ) यांनी केला आहे.
Kiran Bedi , PM Modi
Kiran Bedi , PM Modisarkarnama

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमधील चुक (Pm Security Breach) झाल्याची घटना नुकतीच पंजाबमध्ये घडली आहे. या पार्श्वभूमीवर माजी आयपीएस (IPS) अधिकारी किरण बेदी यांना मोठा आरोप केला आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चुक ही पूर्वनियोजित कट होता,'' असा गंभीर आरोप किरण बेदी (Kiran Bedi ) यांनी केला आहे.

मोदींच्या दैाऱ्यादरम्यान पंजाबचे पोलिस महासंचालक उपस्थित नव्हते. पंजाबचे गृहमंत्री आणि सचिव मोदींच्या दैाऱ्यादरम्यान उपस्थित नव्हते. जिल्हाधिकारी देखील यावेळी उपस्थित नव्हते. यामुळे मोदींच्या घातपाताचा कट होता का, असा संशय किरण बेदी यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पंजाब दौर्‍यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला.

या दोन तासांच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला. कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला होता.

Kiran Bedi , PM Modi
अशी असते पंतप्रधानांची सुरक्षा यंत्रणा ; रोज होतो पावणे दोन कोटींचा खर्च!

या प्रकरणी गृह मंत्रालयाने ५ जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांसह १३ अधिकार्‍यांना समन्स पाठवले आहे. केंद्र सरकारच्या ३ अधिकार्‍यांनी या १३ अधिकार्‍यांना समन्स पाठवल्याचे वृत्त आहे. मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याप्रकरणी पंजाबचे पोलीस महासंचालक (DGP), पोलीस महानिरीक्षक (IG) आणि इतर वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांना हे समन्स देण्यात आले आहे.

मोगा, मुक्तसर साहिब, फरीदकोट आणि तरन तारन जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही समन्स बजावण्यात आलेल्या अधिकार्‍यांमध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी १५० अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com