Tripura Election Result: कसब्यात दणदणीत विजय मिळविणाऱ्या काँग्रेसला फटका ; त्रिपुरामध्ये इतक्या जागांवर..

Tripura Assembly Election Result: त्रिपुरामध्ये २९ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.
Congress
CongressSarkarnama

Tripura Assembly Election Updates: त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपने २९ जागांवर विजय मिळवला आहे. लवकरच बहुमताचा आकडा पार करणार आहे. तर नागालँडमध्ये (एनडीपीपी)च्या सहकार्यांनी भाजप विजयाच्या वाटेवर आहे.

त्रिपुरामध्ये २९ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. तर ८ जागांवर आघाडीवर आहे. माकपने पाच जागा जिंकल्या आहेत, तर सहा जागांवर आघाडीवर आहे. तर कसबा मतदार संघात दणदणीत विजय मिळणाऱ्याच्या काँग्रेसे दोन जागा पटकावल्या आहेत.

Congress
Elections Results 2023 Live: मोठी बातमी : दोन राज्यात भाजप गड राखणार ; मेघालयात...

पहिल्यांदा निवडणूक लढणारी टिपरा मोथा पार्टीने ८ जागांवर विजय मिळवला आहे. चार जागावर आघाडीवर आहे. तर आयपीएकटीने एक जागा जिंकली आहे. भाजपच्या विरोधात काँग्रेस टिपरा मोथा पार्टी आणि डाव्या पक्षांसोबत हातमिळवणी केली होती,

आदिवासी बहुल मतदार असलेल्या त्रिपुरामध्ये प्रद्योत देबबर्मा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता. पण तरीही भाजपने जोरदार आघाडी घेतली आहे.

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत 60 जागांवर 86.10% मतदान झाले. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण 4 टक्के कमी आहे. 2018 मध्ये त्रिपुरामध्ये 59 जागांवर 90% मतदान झाले होते.

Congress
Nagaland Assembly Result : नागालॅंड विधानसभेत ६० वर्षांनंतर पोचली महिला : NDPP च्या हेकानी जाखलू ठरल्या पहिल्या महिला आमदार

35 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. यासह भाजपने डाव्यांचा 25 वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. गेल्या निवडणुकीत विजयानंतर पक्षाने बिप्लब देव यांना मुख्यमंत्री बनवले, पण मे 2022 मध्ये माणिक साहा यांना मुख्यमंत्री करण्यात आले.

साहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने निवडणूक लढवली.2023 च्या निवडणुकीत, भाजपने सर्व 60, डाव्या-काँग्रेस आघाडीने (अनुक्रमे 47 आणि 13 जागा) निवडणूक लढवली. टिपरा मोथा पक्षाने 42 जागांवर निवडणूक लढवली.

तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपापल्या जागा जिंकल्या. त्रिपुरामध्ये, माणिक साहा हे पश्चिम त्रिपुरातील नगर बारदोवली येथून, मेघालयातील पश्चिम गारो हिल्समधील दक्षिण तुरा (ST) जागेवरून कॉनराड संगमा आणि नागालँडमधील कोहिमा येथील उत्तर अंगामी II (ST) जागेवरून नेफियू रिओ विजयी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com