
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) लाल किल्ल्यावरुन उद्या रात्री देशाला संबोधित करणार आहेत. शीख समुदायाचे नववे गुरु तेग बहादूर (Guru Tegh Bahadur) यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी गुरुवारी रात्री ९ वाजून ३० मिनीटांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून त्यांचे विचार मांडणार आहेत. मात्र, मोदी हे लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून नाही तर तर लॉनमधूनच भाषण देणार आहेत.
पंतप्रधान मोदी यापूर्वी राष्ट्रीय दिनीव्यतिरीक्त लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवणारे पहिले पंतप्रधान ठरले होते. त्यानंतर आता उद्याच्या संबोधनानंतर मोदींकडून आणखी एक परंपरा मोडीत निघणार असून ते सुर्यास्तानंतर लाल किल्ल्यावरुन पहिल्यांदाच देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांचे उद्याचे भाषण ऐतिहासिक ठरणार आहे.
सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच किल्ल्यावरून मुघल शासक औरंगजेबने गुरु तेग बहादूर यांना १६७५ मध्ये फाशीच्या शिक्षेचा आदेश दिला होता, त्यामुळेच लाल किल्ल्यावर त्यांच्या ४०० व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे भाषण हे समाजातील विविध समुदायांमध्ये शांती आणि सद्भवानेचा संदेश देणारे असणार आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक खास नाणे आणि टपाल तिकीटाचे अणावरण केले जाणार आहे. तसेच तब्बल ४०० शीख संगीतकारांच्या संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय लंगरचे देखील आयोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.