दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा गृहिणींना 'शॉक'

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत.
दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा गृहिणींना 'शॉक'
PNG

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. अशातच आता एलपीजी सिलिंडरनंतर स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसच्या (PNG) दरात या महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने पीएनजी दरवाढीचे चटके जनतेला बसत आहेत. दिवाळीपर्यंत पीएनजीच्या दरात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे भाव उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. यामुळे केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात 62 टक्के वाढ केली आहे. याचाच परिणाम होऊन पीएनजीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पीएनजीच्या दरात प्रति घनमीटर 2.10 रुपये वाढ करण्यात आल्याने तो आता 35.11 रुपये घनमीटर झाला आहे. दिल्लीसोबत गाझियाबाद, नोएडा, ग्रेटर नोए़डा, रेवाडी, करनाल, गुरूग्राम, मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामली येथे ही वाढ करण्यात आली आहे. याआधी 1 ऑक्टोबरला पीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2.10 रुपये वाढ करण्यात आली होती. दिवाळीपर्यंत आणखी दरवाढ होऊ शकते, असे संकेत आहेत.

एलपीजी दरवाढीचा भडका

देशात पेट्रोलआणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. यातच एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली होती. चालू वर्षातील 9 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत आता 900 रुपयांवर गेली आहे.

PNG
मोठी बातमी : मुंबई पोलिसांसमोर सीबीआय संचालक चौकशीसाठी हजर राहणार नाहीत

देशातील महानगरांमध्ये एलपीजी सिलिंडरची सर्वांत जास्त किंमत कोलकत्यात आहे. कोलकत्यात एलपीजी सिलिंडर 911 रुपयांना आहे. त्याखालोखाल चेन्नईत एलपीजी सिलिंडरची किंमत आता 900.5 रूपये आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईने होरपळत असलेल्या जनतेला आणखी चटके बसू लागले आहेत. सलग तीन महिने सिलिंडरच्या दरात सुमारे 25 रुपये वाढ करण्यात आली आहे.

PNG
थेट सीबीआय संचालकांना समन्स बजावणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सायबर सेलवरच 'हल्ला'

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in