निवडणुका संपताच दणका! वाहनचालकांनंतर आता गृहिणींना दरवाढीचे चटके

एलपीजी सिलिंडरनंतर आता स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) दरवाढ झाली आहे.
PNG
PNG

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच गृहिणींना आता महागाईची मोठी झळ बसू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता स्वयंपाकाच्या पाईप्ड नॅचरल गॅसची (PNG) दरवाढ करण्यात आली आहे. दिल्लीत पीएनजीच्या दरात प्रतियुनिट 1 रूपया वाढ करण्यात आल्याने तो आता प्रतियुनिट 36.61 रुपयांवर पोचला आहे.

इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने ही दरवाढ केली आहे. पीएनजीच्या दरात प्रति घनमीटर 1 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यामुळे घरगुती गॅस ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. या दरवाढीबाबत बोलताना इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे अधिकारी म्हणाले की, देशातील वाढत्या मागणीमुळे देशांतर्गत नैसर्गिक वायूचा पुरवठा अपुरा पडत आहे. यामुळे आयात नैसर्गिक वायूवर अवलंबून राहावे लागत आहे. आयात नैसर्गिक वायूची वाढलेली किंमत आणि डॉलरच्या विनिमयाचा दर यामुळे दरवाढ करावी लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये ठरत असल्याने आगामी काळात ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

PNG
ममतांचा दणका! तृणमूलच्या नेत्यालाच अटक करण्याचे पोलिसांना आदेश

सीएनजी महागला

नैसर्गिक वायूच्या भावाचा भडका आणि केंद्र सरकारने नैसर्गिक वायूच्या दरात तब्बल 62 टक्के वाढ केल्याने सीएनजी सातत्याने महागताना दिसत आहे. यामुळे सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजीचा दर एक रुपयाने वाढवण्यात आला आहे. दिल्लीत सीएनजीचा दर प्रतिकिलो 59.01 रुपयांवर गेला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये सीएनजीचा दर प्रतिकिलो 61.58 रुपयांवर पोचला आहे. याचा सर्वाधिक फटका टॅक्सी, बस आणि रिक्षांसोबत खासगी कारचालकांना होत आहे. स्वस्त इंधनाचा पर्याय म्हणून सीएनजीकडे वळणाऱ्या वाहनचालकांना आता मोठा भुर्दंड यामुळे बसू लागला आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा संघटना आता भाडेवाढ करण्याची मागणी करू लागल्या आहेत.

PNG
कोल्हापूर उत्तरमध्ये संपत्तीत काँग्रेसच्या जाधवांनी भाजपच्या कदमांना टाकलं मागे

एलपीजी सिलिंडरचीही दरवाढ

स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) दरातही वाढ सुरू आहे. मागील वर्षी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 205 रुपयांची वाढ झाली. यानंतर यावर्षी 22 मार्चला 50 रुपयांची वाढ करण्यात आली. यामुळे दिल्ली आणि मुंबईत विनाअंशदानित गॅस सिलिंडरची किंमत 950 रुपयांवर पोचली आहे. दरम्यान, मोदी सरकारने 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली होती. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनाही दरवाढ थांबवली होती. आता देशांतील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका संपल्या असून, पुन्हा दरवाढ सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com