सरसेनाध्यक्ष रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला वैमानिकाची चूक कारणीभूत?

राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
Bipin Rawat and Helicopter crash

Bipin Rawat and Helicopter crash

Sarkarnama

नवी दिल्ली : सरसेनाध्यक्ष (CDS) जनरल बिपिन रावत (Bipin Rawat) यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. या अपघाताबद्दल वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह (Rajnath Singh) यांनी अपघाताची तिन्ही सैन्य दलांकडून चौकशी करण्याची घोषणा लोकसभेत केली होती. हा अपघात वैमानिकाच्या चुकीमुळे घडला असावा, असा निष्कर्ष चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जनरल बिपिन रावत हे 8 डिसेंबरला तमिळनाडूच्या निलगिरी पर्वत रांगेतील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेज वेलिंग्टन या ठिकाणी तिथले प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जात होते. जनरल रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका आणि इतर 10 जणांना घेऊन एमआय-17व्ही5 हे हेलिकॉप्टर जात होते. तमिळनाडूतील सुलूर हवाई तळावरून ते कोईमतूर येथील वेलिंग्टन येथील डिफेन्स स्टाफ सर्व्हिसेस कॉलेजमध्ये जात होते. त्यावेळी या हेलिकॉप्टरला अपघात झाला होता. यातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती हवाई दलाने दिली होती.

<div class="paragraphs"><p>Bipin Rawat and Helicopter crash</p></div>
राजकारण पेटलं! उमेदवारी मिळण्याआधीच बड्या नेत्याची हत्या

हा अपघात कंट्रोल्ड फ्लाईट इनटू टेरेनमुळे (सीएफआयटी) झाल्याचे समोर येत आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या माहितीनुसार, वैमानिकाचे नियंत्रण असताना हेलिकॉप्टर जमीन, पाणी अथवा इतर अडथळ्यांना धडकून झालेल्या अपघाताला सीएफआयटी म्हणतात. रावत यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर हे सुरक्षित होते आणि अपघात घडला त्यावेळी बिघडलेले नव्हते. त्यावर वैमानिकाचे नियंत्रण होते. या अपघाताला धुकेही कारणीभूत असल्याचे समोर येत आहे.

<div class="paragraphs"><p>Bipin Rawat and Helicopter crash</p></div>
भाजपला लवकरच दे धक्का ! केंद्रीय मंत्र्यांसह 9 आमदार पक्ष सोडण्याच्या वाटेवर

लोकसभेत बोलताना राजनाथसिंह यांनी रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताची माहिती दिली. होती. त्याचवेळी त्यांनी तिन्ही सैन्य दलांकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचेही सांगितले होते. या चौकशीचे नेतृत्व हवाई दलाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चिफ ट्रेनिंग कमांड एअर मार्शल मानवेंद्र सिंह हे करीत आहेत. ते स्वत:ही हेलिकॉप्टर पायलट आहेत. या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स सापडला होता. ब्लॅकबॉक्ससाठी अपघात घडलेल्या ठिकाणापासून 300 मीटर ते 1 किलोमीटर परिसरात शोध घेण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com