गाड्यांच्या टाक्या फुल करा नाहीतर 31 तारखेला होईल परवड! हे आहे कारण...

केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केली आहे.
Petrol-Diesel Latest Marathi News, Fuel Price Latest Update
Petrol-Diesel Latest Marathi News, Fuel Price Latest Update Sarkarnama

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या करात कपात केली आहे. पण आता त्याविरोधात पेट्रोल पंप चालक-मालक मैदानात उतरले आहेत. सरकारने चुकीच्या पध्दतीने कर कपात केल्याचा आरोप फामपेडा (Phampeda) या संघटनेने केला आहे. त्यामुळे येत्या 31 मे रोजी कंपन्यांकडून इंधनाची खरेदी केली जाणार नाही. परिणामी, यादिवशी इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. (Petrol-Diesel Latest Marathi News)

केंद्र व राज्याने केलेल्या करकपातीमुळे पेट्रोल व डिझेलचे दर अनुक्रमे 11 रुपये 58 पैसे आणि 8 रुपये 44 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पण पेट्रोल पंप चालकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी केला आहे. याबाबत संघटनेची शुक्रवारी बैठक झाली आहे.

Petrol-Diesel Latest Marathi News, Fuel Price Latest Update
राज्यात पेट्रोल 11 रुपये 58 पैसे अन् डिझेल 8 रुपये 44 पैशांनी झाले कमी; असे असतील नवे दर

लोध यांनी सांगितले की, येत्या 31 मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाची खरेदी केली जाणार नाही. शिल्लक साठा असेपर्यंतच यादिवशी इंधनाची विक्री केली जाईल. अचानक केलेल्या कर कपातीमुळे पेट्रोल पंप चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोणतंही नियोजन न करता किंवा पुर्वकल्पना न देता दुसऱ्यांचा कर कपात केली आहे. 2017 पासून कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे पंप चालक-मालकांमध्ये नाराजी आहे.

संघटनेच्या या भूमिकेमुळे 31 मे रोजी राज्यात इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे आदल्यादिवशीच पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी होऊ शकते. तसेच 31 तारखेला इंधन पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 व 6 रुपये कपात केली आहे.

Petrol-Diesel Latest Marathi News, Fuel Price Latest Update
ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसेनं टाकला पहिला डाव

दरम्यान, मोदी सरकारने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरला पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडूनही दरवाढ थांबवण्यात आली होती. नंतर ती पुन्हा सुरू झाली होती. त्यावेळी सर्व भाजपशासित राज्यांसह काही विरोधी पक्षांच्या राज्यांनीही दर कमी केले. पण महाराष्ट्र सरकारने कपात केली नव्हती. आता दुसऱ्यांदा केंदाने कपात केल्यानंतर राज्य सरकारनेही दर कपात केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com