पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मोदी सरकारनंतर तेल कंपन्यांचंही मोठं पाऊल

पेट्रोलियम कंपन्यांनीही नागरिकांना दिलासा देत दरवाढ तात्पुरती स्थगित केल्याचे समोर आले आहे.
पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीवर मोदी सरकारनंतर तेल कंपन्यांचंही मोठं पाऊल
Petrol, Diesel RatesSarkarnama

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. यामुळे मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनीही नागरिकांना दिलासा देत दरवाढ तात्पुरती स्थगित केल्याचे समोर आले आहे. सलग 13 दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनाही दरवाढ तात्पुरती थांबवल्याचे दिसत आहे. सलग 13 दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ केलेली नाही. आज पेट्रोलचा दर दिल्लीत 103.97 रुपये असून, डिझेलचा दर 86.67 रुपये लिटर आहे. मुंबई पेट्रोलचा दर 109.98 रुपये आणि डिझेलचा दर 94.14 रुपये आहे.

Petrol, Diesel Rates
प्रदेशाध्यक्ष वेळेत न आल्याने काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदाराने शपथच घेतली नाही!

उत्पादन शुल्क कमी केल्याने केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

Petrol, Diesel Rates
काँग्रेस सोडलेले माजी मुख्यमंत्री राज्यसभेवर जाणार अन् विधानसभाही लढणार!

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजप आणि विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in