निवडणुका संपताच मतदारांना 'रिटर्न गिफ्ट'; आठवडाभरात पाचवी इंधन दरवाढ

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
petrol and diesel prices increased for five days in week india
petrol and diesel prices increased for five days in week india

नवी दिल्ली : देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आठवडाभरात पाचव्यांदा इंधन दरवाढीचा (Fuel Prices) झटका सामान्य नागरिकांना बसला आहे. आठवडाभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.33 रुपये वाढ झाली आहे. 

देशातील चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांमुळे मागील काही काळ इंधन दरवाढ बंद होती. या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ पुन्हा सुरू झाली. आठवडाभरात पाचव्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. 

आज पेट्रोलच्या दरात 26 पैसे तर डिझेलच्या दरात 33 पैसे वाढ करण्यात आली. इंधन दरात 4 मेनंतर झालेली पाचवी दरवाढ आहेत. फेब्रुवारीच्या मध्यात काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली होती. आता दरवाढ सुरू झाल्याने पेट्रोलने पुन्हा शंभरी गाठली आहे. आठवडाभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.33 रुपये वाढ झाली आहे. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. मोदी सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 

केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातून आधी वर्षाला 72 हजार 160 कोटी रुपये मिळत होते. ही रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत गेली आहे. मागील आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या दहा महिन्यांतच सरकारने यातून 2.94 लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. याचवेळी सर्वसामान्यांचा विचार करता 2014 पासून त्यांच्या उत्पन्नात केवळ 36 टक्के वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारी दर्शवते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com