सलग बारा दिवसांच्या भडक्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला 'ब्रेक'

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. मागील सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरू आहे.
petrol and diesel prices are stable after continuous rise for 12 days
petrol and diesel prices are stable after continuous rise for 12 days

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असताना मागील सलग 12 दिवस इंधन दरवाढ सुरू होती. अनेक राज्यांत पेट्रोलच्या दराने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. यावरुन केंद्रातील भाजप सरकारला विरोधकांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. सलग 12 दिवस झालेल्या वाढीनंतर आज मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीला 'ब्रेक' लागला आहे. 

अनेक राज्यांत पेट्रोल प्रतिलिटर शंभर रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मागील 12 दिवसांत पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 3.63 रुपये आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 3.84 रुपये वाढ झाली आहे. केंद्र सरकार प्रतिलिटर पेट्रोलमागे ३२.९ रुपये एवढा कर आकारत आहे. राज्य सरकार २६.७८ रुपये कर आकारत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचे कारण देत केंद्र अथवा राज्य सरकार महसुलावर पाणी सोडण्यास तयार नाही. 

सलग बारा दिवस इंधन दरांत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ९७ रुपयांवर पोचले होते. तसेत, डिझेल ८८.६ रुपये प्रतिलिटरवर पोचले होते. आज तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ न केल्याने दरात कोणताही बदल झाला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर आज प्रतिलिटर 90.58 रुपये आहे. याचवेळी डिझेलचा दर प्रतिलिटर 80.97 रुपये आहे. बंगळूरमध्ये  पेट्रोल प्रतिलिटर 93.61 रुपये तर डिझेल प्रतिलिटर 85.84 रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल प्रतिलिटर 92.59 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 85.98 रूपये आहे. पुण्यात पेट्रोल प्रतिलिटर 94.64 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 86.38 रुपये आहे. 

आयात केलेल्या खनिज तेलावर प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलचे उत्पादन होते. त्यानंतर प्रक्रिया, वाहतुकीचा तसेच, पणन खर्च आणि नफा असे मिळून सुमारे ३.७५ रुपये प्रतिलिटर होतात. त्यानंतर केंद्र सरकारचे उत्पादन शुल्क लागू होते. त्यामध्ये प्रतिलिटर मूलभूत उत्पादन शुल्क १.४ रुपये, विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क ११ रुपये आणि कृषी संरचना व विकास उपकर २.५ रुपये आणि अतिरिक्त उत्पादन शुल्क १८ रुपये असे मिळून ३२.९ रुपयांचे विविध कर आकारले जातात. राज्य सरकार त्यावर २५ टक्के व्हॅट म्हणजेच १६.६६ रुपये आणि १०.१२ रुपये अतिरिक्त कर लावतो. त्यानंतर पेट्रोलचे दर ठरले जातात. याचप्रमाणे डिझेलचे दरसुद्धा ठरवण्यात येतात. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com