'भाजपचे धर्मावर आधारित राजकारण जनता नाकारणार'

केंद्रिय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) पाच राज्यांच्या निवडणूका जाहिर केल्यानंतर या राज्यामंध्ये हालचालींना वेग आला आहे.
'भाजपचे धर्मावर आधारित राजकारण जनता नाकारणार'
Nawab Malik Sarkrnama

लखनौ : भाजपने उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) आतापर्यंत धार्मिक भावनांशी खेळून राजकारण केले. पण युपीच्या जनतेने भाजपचे (BJP) धर्मावर आधारित राजकारण चांगलेच ओळखले आहे. युपीत एका विशिष्ट धर्माचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु होता. पण आता युपीची जनता भाजपचे धर्मावर आधारित राजकारण नाकारत असल्याचे दिसून येत आहे. भाजपचे नेते राजीनामा देऊन समाजवादी पक्षात जात आहेत. अशी प्रतिक्रिया राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (nawab malik) यांनी दिली आहे. (UP Election 2022 latest news)

केंद्रिय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूका जाहिर केल्यानंतर या राज्यामंध्ये हालचालींना वेग आला आहे. सर्व पक्ष कंबर कसून निवडणूकांच्या तयारीला लागले आहेत. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर, महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही यातील तीन राज्यांच्या निवडणूकांच्या रिंगणात उतरले असून आपले नशीब आजमावत आहेत, याबाबत नबाब मलिकांनी भाष्य केलं आहे.

Nawab Malik
शिवसेना गोव्याच्या मैदानात पण भाजपचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच!

आज युपीतील सर्व जनता भाजपच्या विरोधात उभी आहे. १९९३ मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही युपीच्या जनतेने भाजपला नाकारलं होतं, आतही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे युपीत सत्ता परिवर्तन होणार असल्याचे दिसू लागले आहे, असेही नबाव मलिक यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही तीन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. मणिपूरमध्ये कॉंग्रेससोबत आघाडी झाली आहे., युपीत समाजवादी पार्टीसोबत एका जागेसाठी चर्चा झाली असून आणखी काही जागांंसाठी विचार सुरु आहे. तर गोव्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, या ठिकाणी स्वबळावर विचार सुरु आहे.या तिनही ठिकाणी ज्या ठिकाणी निवडणूका लढवण्यात येत आहेत त्या ठिकाणी पक्षाचे नेते नेतृत्व करतील असेही त्यांनी म्हटले आहे.

Nawab Malik
मुख्यमंत्री योगी 'खिचडी' खात असतानाच सात माजी आमदारांनी दिला झटका!

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात युपीतील तीन मंत्र्यांसह काही आमदारांनी भाजपला राजीनामा दिल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार ओबीसी (OBC), दलित समाजातील आहेत. या सात जणांनी शुक्रवारी समाजवादी पक्षात (Samajwadi Party) प्रवेश केला. यामुळे युपीच्या आगामी निवडणूकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in