जुन्या चेहऱ्यांना लोकांची पसंती नाही, म्हणून नवे चेहरे : सत्तारांकडून तेजस ठाकरेंचे स्वागत

Abdul Satttar : शिवाजी पार्कमध्ये घुसखोरी केली तर, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण हाईल.
Abdul Sattar
Abdul SattarSarkarnama

दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे समर्थक आणि राज्याचे नवनिर्वाचित कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना, दसरा मेळावा, पाऊस, लम्पी आजारासह इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे सत्तार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र तेजस ठाकरे यांच्यावरही भाष्य केले आहे.

तेजस ठाकरे यांना आगामी सभांमधून शिवसेनेकडून पुढे आणले जाणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तेजस ठाकरेंना लाँच करण्यात येईल, असे बोलले जात होते. याच मुद्द्यावर सत्तार म्हणाले की, जुन्या चेहऱ्यांना लोक पसंत करत नसतील, म्हणून नवीन चेहरे समोर आणावे लागत आहेत. जुन्या नेत्यांना लोक पसंत करीत नसतात. जळगावमधील सभा जनता पाहत आहे, अशा शब्दात सत्तार यांनी तेजस ठाकरेंचे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे.

Abdul Sattar
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कराल तर कारवाई : सत्तारांचा शिवसेनेला इशारा

दरम्यान सत्तारांनी शिवसेनेलाही इशारा दिला आहे. दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मागील अनेक दिवसांपासून वाद घडून येत आहेत. परवानगी मिळाली नाही तर शिवाजी पार्क मैदानात घुसून दसरा मेळावा घेऊ असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला होता. 'कोण घुसखोरी करतो ? घुसखोरी केली आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर संबधितावर कारवाई होईल, असा सूचक वक्तव्य सत्तार यांनी केले. मुंबईच्या दसऱ्या मेळाव्याची आमच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे. बीकेसी मैदानावर आमची ऐतिहासिक सभा होणार, शिवाजी पार्क मैदानाबद्दल न्यायालय निर्णय देईल, असेही सत्तार म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राने अडीच वर्षात पाहीला नसेल. सरकारने तात्काळ मदत जाहीर केली आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट पैसे शेतकऱ्यांना दिले आहेत. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १ कोटीचा निधी दिला आहे. लसीकरणाचं काम सुरू आहे. आज केंद्र सरकारकडे मागणी करण्यासाठी दिल्लीत आलो आहे. लम्पी आजाराला एनडीआरएफमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे सत्तार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com