पेटीएमवरील कारवाईमागे आयपीएल अन् बेटिंगचे कनेक्शन...

गुगलने प्ले स्टोअरमधून ऑनलाइन पेमेंट अॅप पेटीएम काढून टाकले होते. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता पुन्हा पेटीएम प्ले स्टोअरवर आले आहे. पेटीएमचेएक फिचर या कारवाईला कारणीभूत ठरले होते.
paytm back on google play store after removing betting feature on app
paytm back on google play store after removing betting feature on app

नवी दिल्ली : गुगलने नियमभंगाचे कारण देत पेटीएम ॲप हे प्ले स्टोअरवरून काढून टाकल्याने मोठी खळबळ उडाली होती. देशात मोठ्या प्रमाणात नागरिक रोजच्या आर्थिक व्यवहारांत पेटीएम ॲपचा वापर करतात. या ॲपच्या एका फिचरमुळे गुगलच्या नियमांचा भंग होत असल्याचे कारण देत गुगलने ही कारवाई केली होती. पेटीएमने सुरुवातीला याचा इन्कार करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, नंतर पेटीएमने हे फिचर काढून टाकले अन् त्याचे प्ले स्टोअरवर पुनरागमन झाले. 

गुगलच्या धोरणानुसार, प्ले स्टोअरवर क्रीडा स्पर्धांच्या बेटिंगला प्रोत्साहन देणाऱ्या ॲपला आणि ऑनलाइन कॅसिनोला बंदी आहे. तसेच, एखाद्या ॲपमध्ये दुसऱ्या एका संकेतस्थळाची लिंक देऊन त्या लिंकवरून सशुल्क ऑनलाइन स्पर्धांमध्ये सहभाग घेता येत असेल आणि त्या माध्यमातून रोख रक्कम जिंकता येत असेल, तर अशा ॲपवर बंदी आहे. पेटीएमने त्यांच्या ॲपच्या माध्यमातून काही खेळांचा प्रचार करीत प्ले स्टोअरच्या धोरणांचा सलग काही वेळा भंग केला. 

देशात गुगल पे या ॲपला पेटीएमशी स्पर्धा करावी लागत आहे. यामुळे गुगलने केलेल्या कारवाईने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पेटीएम ही देशातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली स्टार्टअप कंपनी आहे. पेटीएमने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने ग्राहकांची क्रिकेटबाबतची आवड लक्षात घेऊन ॲपवर पेटीएम क्रिकेट लीग हे गेम फिचर सुरु केले होते. या गेममध्ये ग्राहकांना प्रत्येक व्यवहारानंतर खेळाडूचे स्टिकर मिळतात आणि त्याद्वारे ग्राहकांना कॅशबॅक मिळत होता. कॅशबॅकला भारतात कायदेशीर आधार असून, कंपनीने सर्व नियमांचे पालन केले आहे. परंतु, गुगलला हा त्यांच्या नियमांचा भंग वाटला आणि त्यांनी प्ले स्टोअरवरून ॲप काढले. कॅशबॅक हे फिचर काढून टाकले असून, ॲप पुन्हा एकदा प्ले स्टोअरवर आले आहे. 

याबद्दल बोलताना पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा म्हणाले की, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे. पेटीएम ॲप पुन्हा प्ले स्टोअरवर आले आहे. आम्ही यूपीआय कॅशबॅक मोहीम आज सकाळपासून सुरु केली होती. याच कारणामुळे गुगलने आमची सेवा बंद करून टाकली. भारतीयांनीच आता ठरवावे की कॅशबॅक म्हणजे सट्टेबाजी आहे का? 

उद्यापासून आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बेटिंग होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या ॲपपासून दूर राहावे, असा इशारा गुगलने पेटीएमवर कारवाई करुन दिला आहे. भारतात बेटिंगला कायद्याने बंदी आहे. डिस्ने प्लस हॉटस्टार या ऑनडिमांड व्हिडिओ स्ट्रीमिंग करणाऱ्या कंपनीलाही फँटसी स्पोर्ट्‌स ॲपची जाहिरात करण्यापूर्वी याबाबतचा इशारा द्यावा, अशी सूचना गुगलने केली आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com