Karnataka Election : शरद पवारांचा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना कानमंत्र : निवडणुकीत राष्ट्रवादी देणार पाठिंबा

समितीच्या पदधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात येणार आहे, अशी माहितीही पवार यांना दिली.
Sharad Pawar-Maharashtra Integration Committee Logo
Sharad Pawar-Maharashtra Integration Committee LogoSarkarnama

बेळगाव : कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय डावपेचांना वेग येऊ लागला आहे. कर्नाटकातील सीमावर्ती भागात मराठी भाषिकांची भूमिका निर्णायक ठरते. बेळगाव आणि परिसरात महाराष्ट्र एकीकरण समिती आतापर्यंत निवडणूक लढवत आली आहे. आताही समिती निवडणुकीच्या मैदानात उतरली असून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी समितीच्या नेत्यांना निवडणुकीबाबत कानमंत्र दिला आहे. (Sharad Pawar's discussion with leaders of Maharashtra Integration Committee regarding Karnataka assembly elections)

महाराष्ट्र एकीकरण समितीने विधानसभेची निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवावी, अशी सूचना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना केली आहे.

Sharad Pawar-Maharashtra Integration Committee Logo
Tanaji Sawant News : वाह रे आरोग्यमंत्री...हे तर महाराष्ट्राचे दुर्दैव... : सावंतांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे विधान सभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समितीच्या नेत्यांची चर्चा केली. प्रत्येक मतदार संघात काय स्थिती आहे, याची माहिती त्यांनी समितीच्या नेत्यांकडून जाणून घेतली आहे. त्यामुळे पवार निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे दिसून येत आहे. समितीच्या पदधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात येणार आहे, अशी माहितीही पवार यांना दिली.

Sharad Pawar-Maharashtra Integration Committee Logo
Jayant Patil News : ही लढाई एकतर्फी नाही : निवडणुकीबाबत जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना इशारा

समितीने आपले उमेदवार लवकर जाहीर करावेत, अशी मागणी होऊ लागली आहे. मात्र, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती समितीतर्फे देण्यात आली आहे. समितीच्या उमेदवार निवडीकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Sharad Pawar-Maharashtra Integration Committee Logo
Sambhaji Raje On Sawant : मग्रूर, निर्ढावलेल्या तानाजी सावंतांचा राजीनामा घ्या; अन्यथा.... : संभाजीराजेंचा सरकारला इशारा

बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर आणि खानापूर या मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे उमेदवार उभे केले जाणार आहेत. पवार यांनी समिती नेत्यांशी फोनवर संपर्क साधून सीमा भागातील हालचालींबाबत माहिती घेतली. निवडणुकीत समितीचे उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी दोन-दोन उमेदवार जाहीर करण्यात येऊ नये, अशीही ताकीद त्यांनी दिली. समितीच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठबळ देणार आहे, त्यामुळे समितीला मोठे बळ मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com