धक्कादायक : भाजप माजी आमदाराच्या भावांची गोळ्या झाडून हत्या

महिनाभरात चित्तरंजन शर्मा यांच्या चार नातेवाईकांची हत्या करण्यात आली. (Bihar Crime News)
Bihar Crime News
Bihar Crime Newssarkarnama

पाटना : बिहारमध्ये भाजप माजी आमदाराच्या भावांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी पाटणा येथील पत्रकार नगर येथे ही घटना घडली. शंभू शर्मा आणि गौतम शर्मा अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत ते बिहारमध्ये भाजपचे (bjp)माजी आमदार चित्तरंजन शर्मा यांचे हे भाऊ आहेत.

गेल्या महिन्यात २६ एप्रिल रोजी चित्तरंजन यांचे काका अभिराम शर्मा यांची जहानाबादमध्ये आणि पुतण्या दिनेश शर्मा यांची मसौधीमध्ये हत्या करण्यात आली होती, या हत्येमागे नीमा येथील पांडव टोळीचा मुख्य सूत्रधार संजय सिंह याचा हात असल्याची चर्चा आहे. गेल्या महिनाभरात चित्तरंजन शर्मा यांच्या चार नातेवाईकांची हत्या करण्यात आली. (Bihar Crime News)

"नीमा गावात वर्चस्वासाठी दोन गटांमध्ये टोळीयुद्ध सुरू आहे. यामध्ये हत्येची प्रकरण समोर येत आहेत. या हत्येमागे प्रथमदर्शनी संजय सिंहचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या पोलिस आरोपांचा शोध घेत आहेत, असे पाटण्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले.

संजय सिंह यांचा जवळचा सहकारी सुधीर शर्मा याची काही दिवसापूर्वी धनरुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात माजी आमदार किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचं नाव आलं नाही. याचा सूड घेण्यासाठी माजी आमदाराच्या दोन्ही भावांची हत्या करण्यात आली.

चित्तरंजन, बबलू, संजय सिंह, अशोक आणि विपिन या नीमा गावातील पाच मित्रांनी १९९५ मध्ये पांडव गँग बनवली. त्यांनी जहानाबाद, पाटणासह अनेक जिल्हे खंडणी, खून, अपहरण अशा अनेक गुन्हे केले. जहानाबादमध्ये सुमारे डझनभर हत्या करण्यात आल्या. नंतर टोळी फुटली आणि चित्तरंजन आणि संजय वेगळे झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com