पंतप्रधान मोदींनी टीका केली अन् खासदाराने 'पापडी चाट'वर मारला ताव

भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
Passing legislation or making papri chaat says Derek Obrien
Passing legislation or making papri chaat says Derek Obrien

नवी दिल्ली : पेगॅसस प्रकरणावरून विरोधकांकडून दररोज संसदेत गोंधळ घातला जात आहे. त्यामुळे विविध विधेयकांवर चर्चा न होताच कायदे मंजूर केले जात आहे. यावरून तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी अधिवेशनाच्या काळात मंजूर कायद्यांची यादीच टाकली आहे. हे ट्विट करताना त्यांनी 'कायदे मंजूर करतायं की पापडी चाट बनवतायं' असं विधान केलं. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हा संसदेचा अवमान असल्याची जोरदार टीका केली आहे. (Passing legislation or making papri chaat says Derek Obrien)

ओब्रायन यांच्या ट्विटवरून भाजप नेत्यांना त्यांना धारेवर धरले आहे. मंगळवारी भाजप खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. विरोधकांकडून सातत्याने संसदेचे कामकाज बंद पाडले जात आहे. हा संसद, लोकशाही आणि लोकांचा अपमान आहे. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांच्या कृतीमुळे संसदेचा सातत्याने अवमान होत आहे. मंत्र्याच्या हातातून कागद हिसकावून घेत ते फाडत हवेत भिरकवण्याचा प्रकार संसदेत घडला. 

तृणमूलचे राज्यसभा खासदार शंतनू सेन यांनी माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्वनी वैष्णव यांच्या हातातून कागद घेत फाडले होते. तसेच पंतप्रधानांनी ओब्रायन यांच्या ट्विटच्या अनुषंगानेही टीका केली. ज्येष्ठ खासदारानेही कायदे मंजूरीवरून अपमानजनक विधान केल्याचे पंतप्रधान म्हणाले. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हा जोशी आणि राज्यसभेचे उपसभापती एम. ए. नक्वी यांनीही ओब्रायन यांच्यावर टीका केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेनंतर ओब्रायन यांनी दिल्लीत लोकसभेतील खासदार ककोली घोष दस्तगीर यांच्यासोबत पापडी चाटचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींनाही आमंत्रण दिलं होतं. माध्यमांशी बोलताना ओब्रायन म्हणाले, मी लोकांच्या भाषेत बोलतो. लोकांपर्यंत माहिती पोहचवण्यासाठी मी या लोकप्रिय पदार्थाचा उल्लेख केला आहे. पापडी चाट ऐवजी ढोकळ्याचा उल्लेख केला असता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आनंदी झाले असते, असा टोलाही ओब्रायन यांनी लगावला.

ओब्रायन यांनी आपल्या वादग्रस्त ट्विटमध्ये संसदेत मंजूर कायद्यांची माहिती दिली आहे. पहिल्या दहा दिवसांमध्ये मोदी व शहा यांनी 12 कायद्यांना मंजूरी दिली आहे. एका कायद्यासाठी केवळ सात मिनिटे या वेगाने हे कायदे पारित झाले आहे, असं म्हणत ओब्रायन यांनी पापडी चाट चा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com