Karnataka Assembly Electon : येडियुरप्पा जुने हिशेब चुकते करणार...भाजपचा फायर ब्रॅंड नेता अडचणीत?

भाजपला मतदान करु नका, नसेल तर मतदानास येऊच नका, अशी मोहीम सुरु केल्यामुळे बसवनगौडा चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
B. S. Yediurappa-BasavanGowda Patil
B. S. Yediurappa-BasavanGowda PatilSarkarnama

सोलापूर : मूलभूत विकास, रोजगाराचा प्रश्‍न यापेक्षा जातीवर आधारित निवडणुकीचा सिलसिला असलेल्या विजयपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yeddiurappa) यांच्या विरोधात उघड बंड करुन त्यांना पायउतार करणारे फायर ब्रँड उमेदवार आमदार बसवनगौडा पाटील (यत्नाळ) यांची काँग्रेसचे (Congress) अब्दुल हमीद मुश्रीफ यांच्याशी दुसऱ्यांदा जोरदार लढत होत आहे. विजापुरात ‘काटे की टक्कर' पहावयाला मिळणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आपले जुने हिशेब चुकते करणार असल्याचीही चर्चा मतदारसंघात रंगली आहे. (Party's fire brand MLA Basavan Gowda Patil will be in trouble due to the disgruntled group in BJP)

धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार महाभारी यांनी काँग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केल्याने सध्यातरी मुश्रीफ यांचे पारडे जड वाटू लागले आहे. परंतु त्यांच्या प्रतिमेचा मोठा प्रश्‍न आहे. आपचे हाशीमपीर वालीकर रिंगणात आहेत. भाजपच्या नाराज गटाने म्हणजे बसवनगौडा यांच्या अगदी किचन कॅबिनेटमधील कार्यकर्त्यांनी फोनवरुन भाजपला मतदान करु नका, नसेल तर मतदानास येऊच नका, अशी मोहीम सुरु केल्यामुळे बसवनगौडा चांगलेच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

B. S. Yediurappa-BasavanGowda Patil
Sharad Pawar News : तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची आवश्यकता होती; पण...: शरद पवार राजीनाम्यावर दोन दिवसांनंतर बोलले

गेल्या निवडणुकीत पाटील आणि मुश्रीफ यांच्यात झालेल्या लढतीत पाटील यांचा निसटता म्हणजे अगदी शेवटच्या दोन फेऱ्यात सहा हजार ४१३ मतांनी विजय झाला. महापालिकेत ३५ पैकी १७ नगरसेवक निवडून आणण्यात पाटील यांचा मोठा वाटा आहे. चार महिने उलटूनही महापौरपदाचे आरक्षण न निघाल्याने अजूनही विजापूर महापालिकेचा महापौर निवडला गेला नाही. नगरसेवक नसतानाही पाटील यांनी रस्त्यांचा विकास, पंतप्रधान आवास योजनेचा तसेच विविध केंद्रीय योजनांचा सर्वाधिक लाभ मिळवून दिला, ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

अथणी रस्त्याला आकर्षक दिवाबत्ती, सुंदर पदपथ, विविध सोयी-सुविधांची बरसात करुन सिंगापूरची उपमा देत विकासाचे मॉडेल दाखविण्यात येत आहे. सुशिक्षितांची मते खेचून घेण्यात पाटील यशस्वी होतील. तसेच मुस्लिमांची एक गठ्ठा मते मुश्रीफ यंदा खेचतील असा कयास आहे. विजापूरचे लोकप्रतिनिधी असताना इथेनॉलचा प्रकल्प गुलबर्गा येथे टाकल्याने पाटील यांच्यावर नाराजी आहे. सध्या तरी मोदी फॅक्टरवरच या मतदारसंघाची मदार आहे.

B. S. Yediurappa-BasavanGowda Patil
Solapur DCC Bank Election : भाजप आमदारांच्या आग्रहामुळे सोलापूर डीसीसीच्या प्रशासकाला मुदतवाढ

पाटील मतदारसंघातील प्रचारापासून दूरच

भाजपच्या पाटील यांना स्पष्टवक्तेपणाच नडणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. तर जुना हिशेब चुकता करण्याच्या भूमिकेतून येडियुरप्पा यांनी त्यांचे नाव स्टार प्रचारकामध्ये टाकल्याने मतदारसंघातील प्रचारापासून ते दूरच आहेत. सध्यातरी त्यांचे फॅमिली मेंबरच प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. येडियुरप्पा यांच्या विरोधातील बंडाला वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याचाही दावा भाजपच्या कार्यकर्त्यांतून होत आहे.

B. S. Yediurappa-BasavanGowda Patil
Sharad Pawar's Pandharpur Tour : अभिजित पाटील शरद पवारांना भेटले अन॒ पंढरपूरचा दौरा फिक्स करून आले

- काँग्रेसच्या उमेदवारामुळे एमआयएमचा लढतीस नकार

- विजयपूरमध्ये निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला

- मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याची भाजपपुढे कसोटी

- ऑपरेशन कमळमुळे संघ परिवाराची मोठी नाराजी

- भाजप खासदार रमेश जिगजिणगी यांची अनास्था

- नवमतदारांवर आजही मोदींचे गारुड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com