अर्णब गोस्वामी अडचणीत...मास्टरमाईंड असल्याची उच्च न्यायालयासमोर माहिती

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी हे बनावट टीआरपी प्रकरणात चांगलेच अडचणीत आले आहेत.
partho dasgupta lawyer says arnab goswami is mastermind in trp scam
partho dasgupta lawyer says arnab goswami is mastermind in trp scam

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाल्याने खळबळ उडाली होती. आता बनावट टीआरपी प्रकरणाचे मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी हे आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयासमोर सांगितले आहे. यामुळे गोस्वामींच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर काल (ता.25) सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.    

दासगुप्ता यांची तब्येत बिघडल्याने त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावर दासगुप्ता यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत सरकारी पक्षाने जामीन देण्यास विरोध केला. अखेर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यांपर्यंत तहकूब केली आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com