अर्णब 'चॅटगेट'मधील दासगुप्तांचा पोलिसांकडून छळ अन् कैद्यांकडूनही मारहाण; पत्नीचा गंभीर आरोप

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट उघड झाले आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
partho dasgupatas wife alleged police tortured her husband in jail
partho dasgupatas wife alleged police tortured her husband in jail

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त व्हॉट्सअॅप चॅट उघड झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कारागृहात दासगुप्तांचा छळ करुन इतर कैद्यांच्याद्वारे मारहाण करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

या वादग्रस्त 'चॅटगेट'वरुन मोठा गदारोळ सुरू आहे. दासगुप्ता हे तळोजा कारागृहात होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना मधुमेह असून, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यास सुरवात झाली होती. त्यांना १६ जानेवारीला पहाटे त्यांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) कृत्रिम श्वसनावर ठेवण्यात आले आहे. त्यांचा जामीन न्यायालयाने नुकताच फेटाळला होता. या प्रकरणात त्यांचा मोठा हात असल्याने त्यांना जामीन देण्यात आला नव्हता. 

दासगुप्ता यांना २४ डिसेंबरला अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची रवानगी तळोजा कारागृहात झाली होती. दासगुप्ता यांच्या पत्नी सम्राज्ञी दासगुप्ता यांनी म्हटले आहे की, माझा पती हा त्यांच्या खेळातील प्यादा बनला आहे. वर्षाला ४ कोटी रुपये पगार असलेला व्यक्ती ३० लाख रुपयांसाठी अवैध गोष्टी कशासाठी करेल. त्यांना पोलिसांना मारहाण केली. नंतर इतर कैद्यांच्याद्वारेही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती आम्हाला देण्यात आली नव्हती. मी रुग्णालयात पोचले तेव्हा ते म्हणाले की, त्यांना पुन्हा कारागृहात नेल्यास पोलीस त्यांना मारून टाकतील. 

बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. गोस्वामी यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांना अटक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरीम जामीन दिला आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. या प्रकरणी अटक झालेले ते पंधरावे आरोपी आहेत. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील वादग्रस्त चॅट मुंबई पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय आणि माहिती व प्रसारण मंत्रालयचा वापर व्यवसायाच्या वाढीसाठी केल्याचे समोर आले आहे. गोस्वामी यांनी पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील स्वत:च्या वजनाचा अभिमानाने अनेक वेळा उल्लेख केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दासगुप्ता या प्रकरणातील सूत्रधार आहेत. ते बीएआरसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना 2016 ते 2019 या काळात हा गैरव्यवहार झाला. दासगुप्ता हे जून 2013 ते नोव्हेंबर 2019 या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना टीआरपी वाढवण्यासाठी गोस्वामी यांच्याकडून लाखो रुपये मिळत होते. याचा फायदा अखेर रिपब्लिक टीव्ही आणि रिपब्लिक भारत या चॅनलना होत होता. या पैशातून दासगुप्ता हे महागडे दागिने, घड्याळे आदी गोष्टींची खरेदी करीत होता. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com