Sengol : राजदंड सोपवणाऱ्या पुजाऱ्याचे मोदींविषयी मोठं विधान ; म्हणाले, ते पुन्हा पंतप्रधान..

Parliament New Building Inauguration : राजदंड (सेंगोल) लोकसभाध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापित केला जाणार आहे.
Parliament New Building Inauguration :
Parliament New Building Inauguration :Sarkarnama

Parliament New Building Inauguration : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन येत्या २८ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. .(parliament new building inauguration priest who will hand over sengol to pm narendra modi gave a big statement)

काही विरोधीपक्षांनी त्याला विरोध केला आहे. मोदी यांच्याऐवजी लोकसभेचे अध्यक्ष किंवा राष्ट्रपती यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे

या उद्धघाटन सोहळ्यात तमिळनाडू येथून आणलेल्या 'सेंगोल' (sengol) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजदंडाविषयी सध्या चर्चा आहे. या राजदंडाविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. ऐतिहासिक राजदंड लोकसभाध्यक्षांच्या आसना शेजारी स्थापित केला जाणार आहे.

थिरुवादुथुराई अथिनाम’ मठाचे मुख्य पुजारी श्री हरिहर देसिका स्वामीगल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा राजदंड सोपविणार आहे. पुजारी स्वामीगल हे मदुरै मठाचे २९३ वे मुख्य पुजारी आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदींबाबत मोठं विधान केलं आहे.

Parliament New Building Inauguration :
Nine Years Of Modi Govt : 'खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण ; काँग्रेसचा भाजपवर घणाघात..

श्री हरिहर देसिका स्वामीगल म्हणाले, "जागतिक पातळीवर पंतप्रधान मोदींचे कौतुक झाले आहे. याचा देशाला अभिमान आहे. ते जनतेसाठी चांगले काम करीत आहेत," "जगभरातील नेते मोदींचं कौतुक करीत असल्याचे आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर ते पुन्हा पंतप्रधान बनणार आहेत," असे श्री हरिहर देसिका स्वामीगल म्हणाले.

"नवीन संसद भवनाच्या उद्धघाटन सोहळ्यात मी मोदींना भेटणार आहे. त्यांना राजदंड भेट देणार आहे," असे ते म्हणाले.

या राजदंडाची निर्मिती करण्याची जबाबदारी ‘वुम्मीदी बंगारू चेट्टी ज्वेलर्स’वर सोपवण्यात आली. वुम्मीदी इथिराजुलू आणि वुम्मीदी सुधाकर या दोन व्यक्तींनी या राजदंडाची निर्मिती केली. या राजदंडाची लांबी पाच फूट आहे. तसेच त्यावर एक नंदी आहे. नंदी हे न्यायाचे प्रतीक आहे.

Parliament New Building Inauguration :
Pune Lok Sabha constituency : पुणे लोकसभा पोटनिवडणूक ; पक्षाने संधी दिली तर त्याचं सोनं करण्याची मुळीकांची तयारी !
  • पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १४ ऑगस्ट १९४७ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता हा राजदंड ब्रिटिशांकडून स्वीकारला होता..

  • या राजदंडाकडे स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.

  • सेंगोल या शब्दाची व्युत्पत्ती तामिळ भाषेतील सेम्माई या शब्दापासून झालेली आहे.

  • उपलब्ध कागदपत्रांनुसार सेंगोल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राजदंडाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

  • प्रतीकात्मकदृष्ट्या सत्तेचे हस्तांतर म्हणून ब्रिटिशांनी हा राजदंड पंडित नेहरू यांच्याकडे सोपवला होता

    (Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com