
नवी दिल्ली : राज्यसभेत सोमवारी आणि मंगळवारी सभागृहात झालेल्या गदारोळामुळे 20 खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाविरोधाक साखळी आंदोलन सुरु आहे. ५० तासांपेक्षा अधिक वेळ हे आंदोलन सुरु आहे. काल (गुरुवार) रात्री संसदेच्या (Parliament House) आवारातील गांधी पुतळ्यासमोर राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेले विरोधी पक्षांचे खासदारांनी निदर्शने केली.
काँग्रेस, डीएमके, टीएमसी, सीपीएम आणि आपचे खासदार 50 तासांचे धरणे देत आहेत. महागाई, जीएसटीवर चर्चा व्हावी या मागणीसाठी हे खासदार निलंबनासाठी उपोषण करत आहेत.
आम आदमी पक्षाचे निलंबित खासदार संजय सिंह हे गुरुवारी रात्री मच्छरदाणीत झोपले होते. टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन, सुष्मिता देव आणि मौसम बेनझीर नूर हेदेखील दिसत आहेत. हे आंदोलन करणारे खासदारांना डासांनी हैराण केले होते.
डासांनी त्रस्त झालेल्या या खासदारांनी काल मॉर्टिनच्या कॉइल जाळत गुरुवारची रात्र काढली. याबाबतचा व्हिडिओ काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी टि्वट केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आरोग्यमंत्र्यांना टॅग केला आहे.
आपल्या टि्वटमध्ये टागोर म्हणतात, "संसद संकुलात डास आहेत, पण विरोधी खासदार घाबरत नाहीत. मनसुख मांडवियाजी कृपया संसदेत भारतीयांचे रक्त वाचवा, बाहेर अदानी त्यांचे रक्त शोषत आहे,"
निलंबित खासदारांमध्ये टीएमसीचे ७, डीएमकेचे ६, तेलंगणा राष्ट्र समितीचे तीन, सीपीआय(एम)चे दोन आणि आम आदमी पार्टी आणि सीपीआयचे प्रत्येकी एक खासदार आहे.
लोकसभेतून निलंबित करण्यात आलेले काँग्रेसचे चार खासदारही या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
आंदोलक खासदारांनी तंबूंची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्यास नकार दिला.
संसदेच्या संकुलात अशा बांधकामांना परवानगी देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.