राणांच्या अश्रूंची संसदीय समितीने घेतली दखल; राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलावणं

Navneet Rana | : नवनीत राणा म्हणाल्या, त्यांना समितीसमोर यावेच लागेल.
Navneet Rana|
Navneet Rana|Sarkarnama

नवी दिल्ली : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणांच्या अश्रूंची आणि तक्रारीची संसदेच्या विशेषाधिकार आणि अचारसंहिता समितीने दखल घेतली आहे. यानुसार १५ जून रोजी राज्यातील सर्वोच्च अधिकाऱ्यांना संसदीय समितीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यात राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा समावेश आहे. २३ मे रोजी त्यांनी संसदीय समितीसमोर आपली बाजू मांडली होती.

संसदीय समितीसमोर बाजू मांडतेवेळी खासदार राणा म्हणाल्या होत्या, हनुमाल चालीसा (Hanumal Chalisa) म्हटल्याने किंवा तसे जाहीर केल्याने नव्हे तर शिवसेनेच्या (ShivSena) गुंडांमुळे २३ एप्रिलला मुंबईतील कायदा सुव्यवस्था बिघडली. तसेच आपल्याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जी वागणूक दिली, जबरदस्तीने गाडीत बसविण्यात आले, जातीवाचक शब्द वापरले गेले. लॉकअपमध्ये आपल्याबरोबर जो गैरर्व्यवहार करण्यात आला त्या सर्वाची माहिती समितीला दिली आहे. आता ही समितीच आपल्याला न्याय देईल असे त्यांनी सांगितले होते. (Navneet Rana Latest News in Marathi)

२३ एप्रिलला मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा इशारा दिल्यावर खासदार राणा व आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ५ मे रोजी विशेष न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला होता. मुंबई पोलिसांनी आपल्याबरोबर गैरव्यवहार व शिवीगाळ केल्याचा पुनरूच्चार करुण खासदार राणा म्हणाल्या होत्या की ''संसदीय समिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठांनाही बोलावेल. त्यांना समितीसमोर यावेच लागेल. मी माझी व्यथा संसदेच्या विशेषाधिकार समितीसमोर मांडली. त्यांच्याकडून आपल्याला न्याय मिळेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com