परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले ? संजय निरूपमांचा सवाल

कॉग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा एक फोटो टि्वट केला आहे.
Parambir Singh, Sanjay Nirupam
Parambir Singh, Sanjay Nirupamsarkarnama

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे सध्या कुठे आहेत, याविषयी सध्या चर्चा सुरु असताना ते बेल्जियममध्ये असल्याची माहिती कॉग्रेसच्या नेत्याने दिल्याने खळबळ उडाली आहे. . परमबीर सिंह बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’ आदी प्रश्न टि्वट करीत त्यांनी परमबीर सिंह यांचा फोटो शेअर केला आहे.

कॉग्रेसचे नेते संजय निरूपम (Sanjay Nirupam) यांनी परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा एक फोटो टि्वट केला आहे. यात ते म्हणतात की, ‘हे आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त. यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर हप्तावसुलीचा आरोप केला होता. परमबीर सिंह पाच प्रकरणांमध्ये वाँटेड आहेत. पोलिसांनी म्हटलं आहे की ते फरार आहेत. आता हे समजलं आहे की ते बेल्जियममध्ये आहेत. परमबीर सिंग बेल्जियममध्ये कसे गेले? त्यांना बेल्जियममध्ये सेफली कुणी पाठवलं? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना देशात आणू शकत नाही का?’

Parambir Singh, Sanjay Nirupam
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : असंघटीत कामगारांना दिवाळीचे खास गिफ्ट

परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंत ४ गुन्हे (FIR) नोंदवण्यात आले आहेत. यातील ३ गुन्हे वसूलीचे तर १ गुन्हा अँट्रोसिटीचा आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात राज्य सरकारने कारवाईचा फास आवळण्यास सुरवात केली आहे. त्याच्या वेतनाबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला काही सूचना दिल्या आहेत. परमबीर सिंह यांच्यासह २५ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

मुंबईच्या आयुक्तपदावरुन गृहरक्षक दलामध्ये उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी २० मार्चला लेटर बॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh) आणि राज्य सरकारला अडचणीत आणलं. परमबीर सिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. मात्र, अनेक महिने ते गैरहजर राहिल्याने कोषागार कार्यालयाने विचारणा केली होती. एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात परमबीर सिंह आठ दिवसांची रजा घेऊन चंदीगडला त्यांच्या निवासस्थानी गेले. त्यानंतर तिथूनच ते सिक लिव्ह दर १५ दिवसांनी वाढवत राहिले.त्याचं वेतन रोखलं आहे.चैाकशीत परमबीर सिंह हे गेल्या पाच महिन्यापासून गायब असल्याची माहिती गृहविभागाला मिळाली आहे. यानंतर गृहविभागाने होमगार्ड विभागाला परमबीर सिंह यांचे वेतन रोखण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्याला शंभर कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे.

ते मे महिन्यात रजेवर गेले. तेव्हापासून परमबीर सिंह हे गृहविभागाच्या संपर्कात नाही. शंभर कोटी वसुलीचा तपास करणाऱ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर साक्ष देण्यासाठी परमबीर सिंह उपस्थित राहिले नाहीत. परमबीर सिंह यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून चांदीवार आयोगाकडे शपथपत्र सादर केले आहे. ''शंभर कोटीच्या वसुलीच्या बाबतीत मला काहिही माहित नाही, मला याबाबत कुठलीही साक्ष द्यायची नाही,'' असे परमबीर सिंह यांनी या शपथपत्रात म्हटलं आहे. हे पत्र चंडीगड येथून पाठविल्याचे तपासात स्पष्ट झाले आहेत. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) परमबीर यांच्याशी पत्र व्यवहार केला असता, त्यांनी त्यांच्यावर शस्त्र क्रिया केली जाणार असल्याचे सांगत मेडिकल कागदपत्रे पाठवली. सरकारने यापूर्वी सिंग यांच्या चंडिगढ येथील घराच्या पत्त्यावर दोन वेळा पत्र व्यवहार केला आहे. मात्र कोणतही उत्तर आलं नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com