बंगालमध्ये भाजपला झटका...महिला नेत्याच्या आरोपानंतर विजयवर्गीय, राकेशसिंह अडचणीत

पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. आता भाजपच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
pamela goswami says she has been framed by bjp leaders
pamela goswami says she has been framed by bjp leaders

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तृणमूल काँग्रेसला खिंडार पाडून अडचणीत आणणारा भाजप आता निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत आल्याचे चित्र आहे. भाजपच्या महिला नेत्यालाच अमली पदार्थांसह अटक केल्याने पक्षाला मोठा झटका बसला आहे. त्यांनी मात्र, यासाठी भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती नेते राकेशसिंह यांना जबाबदार धरल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  

भारतीय जनता युवा मोर्चाच्या राज्य सरचिटणीस पामेला गोस्वामी यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गोस्वामी, त्यांचा मित्र प्रबीर डे आणि सुरक्षा रक्षकासह दक्षिण कोलकत्यातील न्यू अलीपूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 100 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. त्याची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमली पदार्थांच्या तस्करीत काही काळापासून गोस्वामींचा सहभाग आहे. त्या अमली पदार्थांची खरेदी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून गोस्वामी त्यांचा साथीदार प्रबीर डे आणि सुरक्षारक्षकाला अटक केली. त्यांच्याकडून कोकेन जप्त करण्यात आले. 

गोस्वामी यांनी याचे खापर स्वपक्षातील अन्य सहकाऱ्यांवर फोडले आहे. भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे निकटवर्ती राकेशसिंह यांनीच माझ्याविरोधात हे कारस्थान रचले असून, त्यांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करावी, अशी मागणी गोस्वामींनी केली आहे. यामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले असून, पक्षातील ड्रग कनेक्शन समोर आले आहे. यामुळे राकेशसिंह यांच्यासह विजयवर्गीयही अडचणीत आले आहेत. 

याबाबत बोलताना गोस्वामी म्हणाल्या की, या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी केली जावी. भाजप नेते राकेश सिंह यांना अटक करण्यात यावी. माझ्याविरोधात त्यांनीच कारस्थान रचले आहे. राज्य पोलिस आणि तृणमूल काँग्रेसचे सरकारही यामध्ये सहभागी आहे.

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com