Shehbaz Sharif
Shehbaz SharifSarkarnama

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात, माझे कपडे विकेन पण गहू महाग होऊ देणार नाही!

पाकिस्तानात यंदा गव्हाचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) यंदा गव्हाचे उत्पादन कमी राहण्याची चिन्हे आहेत. यामुळे आधीपासून पाकिस्तान सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. पंतप्रधान (Prime Minister) शाहबाज शरीफ यांनी तर यासाठी स्वत:ची कपडे विकण्याची तयारीही बोलून दाखवली आहे. स्वत:चे कपडे विकू पण कोणत्याही स्थितीत गहू महाग होऊ देणार नाही, अशी ग्वाही पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जनतेला दिली आहे.

सौदी अरेबियाकडून पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी ८ अब्ज डॉलरचे कर्ज घेतले. असे असूनही देशातील आर्थिक संकट कमी होताना दिसत नाही. परकी चलनच नव्हे तर बेरोजगारी आणि महागाईमुळे पाकिस्तान अडचणीत आला आहे. देशात अत्यावश्‍यक वस्तूंचे उत्पादन घटले आहे. यातच पाकिस्तानमध्ये यंदा गव्हाचे उत्पादन ३० लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे गव्हाची किंमत प्रचंड वाढण्याची शक्यता आहे.

Shehbaz Sharif
राजकारण तापलं! सासूबाईंशी न पटल्यानं जावयानं थेट पक्षालाच केला रामराम

यामुळे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जनतेला आश्वासन दिले आहे. देशात गव्हाच्या किमती स्थिर राहतील यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, गव्हाच्या उत्पादनावर सरकारचे लक्ष आहे. कोणत्याही स्थितीत सरकार गव्हाचे पीठ महाग होऊ देणार नाही. आपण कपडे विकू, पण गव्हाचे पीठ महाग होऊ देणार नाही. पिठाची किंमत कमी कशी ठेवायची हे आम्हाला माहिती आहे. प्रांतीय सरकारांना गव्हाच्या किमती आटोक्यात ठेवण्यास सांगण्यात येणार आहे.

Shehbaz Sharif
उपमुख्यमंत्र्यांना हरवणाऱ्या पल्लवी पटेल यांच्या नवऱ्यानेच आता सोडला पक्ष

देशात गव्हाचे २८.८९ दशलक्ष टन उत्पादनाचे लक्ष्य आहे. असे असताना केवळ २६.१७ दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन होणार आहे. सध्या पाकिस्तानला ३०.७९ दशलक्ष टन गव्हाची आहे. पाकिस्तानात गव्हाचे उत्पादन कमी होण्यामागे अनेक घटक आहेत. पाणी, खतांची टंचाई आणि किमान आधारभूत मूल्य जाहीर होण्यास विलंब आदी घटक कारणीभूत आहेत. तसेच, उष्णतेची लाट ही अंदाजापेक्षा लवकर आल्यानेही पिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन यंदा २ टक्क्यांनी घसरले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com