Donald Lu
Donald LuSarkarnama

पाकिस्तानमध्ये भूकंप घडवून आणणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं आहे भारत कनेक्शन!

पाकिस्तानमध्ये राजकीय संकट उभे ठाकले असून पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेली संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये राजकीय संकट उभे ठाकले असून पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी केलेली संसद बरखास्तीची शिफारस राष्ट्रपतींनी मान्य केली आहे. सरकार पाडण्यासाठी परदेशातून षडयंत्र रचल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला आहे. तसेच हे षडयंत्र रचलेल्या व्यक्तीचं नावही त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे अमेरिकेलाही (America) हादरा बसला आहे. या व्यक्तीचे भारताशीही (India) कनेक्शन समोर आलं आहे.

इम्रान खान यांच्यावरील अविश्वास ठराव रविवारी संसदेनं (Parliament) फेटाळून लावला. हा ठराव घटनाबाह्य असल्याचे सांगत संसदेच्या उपसभापतींनी ठराव फेटाळून लावला. पण त्याआधीच संसदेत येण्याऐवजी इम्रान खान हे राष्ट्रपतींच्या भेटीला गेल होते. यावेळी त्यांनी संसद बरखास्त करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर काही वेळातच राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ही शिफारस मान्य करत संसद बरखास्त केली. त्यामुळे आता पाकिस्तानात (Pakistan) मध्यावधी निवडणुकांची शक्यता आहे.

Donald Lu
जग हादरलं; रशियाकडून युक्रेनच्या राजधानीत नरसंहार

यानंतर बोलताना इम्रान यांनी डोनाल्ड लू (Donald LU) या व्यक्तीचं नाव जाहीर केलं आहे. अमेरिकेच्या राजकारणात दबदबा असलेले हे चाणक्य आहेत डोनाल्ड लू. त्यांच्यावर सध्या दक्षिण आणि मध्य आशियातील देशांमध्ये अमेरिकेची धोरणं आणि अजेंड्यानुसार काम करण्याची जबाबदारी आहे. आपलं सरकार पाडण्याच्या षडयंत्रात त्यांचाच समावेश असल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला असून त्याचे पुरावे असल्याचा दावाही केला आहे.

अमेरिकन प्रशासनानुसार, लू हे १५ सप्टेंबर २०२१ पासून दक्षिण व मध्य आशियाई विभागात सहायक सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्याआधी ते २०१८ ते २०२१ दरम्यान किर्गिस्तानमध्ये अमेरिकी राजदूत तर २०१५ ते २०१८ मध्ये अल्बानियामध्ये होते. ते अमेरिकेच्या परराष्ट्र सेवा विभागातील अधिकारी आहेत. त्यांच्याजवळ अमेरिका सरकारसाठी काम करण्याचा ३० वर्षांचा अनुभव आहे.

Donald Lu
पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेतही मोठा राजकीय भूकंप; पंतप्रधानांच्या मुलानेच केली सुरूवात...

भारत व पाकिस्तानात महत्वाची भूमिका

डोनाल्ड लू यांनी भारतात अनेक वर्ष काम केले आहे. २०१० ते २०१३ मध्ये ते भारतात अमेरिकेचे डेप्युटी चीफ ऑफ मिशन होते. तसेच २००९ ते २०१० मध्येही त्यांच्याकडे परराष्ट्र विभागाची जबाबदारी होती. १९९७ ते २००० पर्यंत नवी दिल्लीत राजकीय अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. १९९६ ते १९९७ या काळात अमेरिकेच्या राजदुतांचे विशेष सहायक म्हणून त्यांनी भूमिका पार पाडली आहे. त्याआधी ते पाकिस्तानात राजकीय अधिकारी होते. त्यामुळे त्यांच्याजवळ पाकिस्तानसह भारताच्या राजकीय घडामोडींची पूर्ण माहिती असते, असं जाणकार सांगतात. त्यांना इंग्रजीसह हिंदी, उर्दू, रशियन अशा जवळपास आठ भाषांचे ज्ञान आहे.

काय म्हणाले होते इम्रान खान?

संसदेत विश्वासदर्शक ठराव फेटाळल्यानंतर इम्रान यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, कोण खरं कोण खोटं याचा निर्णय आता जनतेनं घ्यावा, मी राष्ट्रपतींची भेट घेऊन संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. माझ्या विरोधात परदेशातून षडयंत्र रचण्यात आलं. त्यासाठी अनेकांनी पैसे घेतले. त्यामुळे आता याचा निर्णय जनताच घेईल. जनतेसमोरच याचा निर्णय होईल, असं इम्रान खान यांनी स्पष्ट केलं. जनतेने आता सार्वत्रिक निवडणुकांसाठी तयार राहावं, असं आवाहनही इम्रान यांनी जनतेला केलं. (Imran Khan News Update)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com