नाट्यमय घडामोडींनंतर पाकिस्तानात पुन्हा 'शरीफ'राज

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सोमवारी पाकिस्तानला 23 वे पंतप्रधान मिळाले.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifSarkarnama

इस्लामाबाद : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर सोमवारी पाकिस्तानला (Pakistan) 23 वे पंतप्रधान मिळाले. पीएमएल (एन) पक्षाचे अध्यक्ष शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांची पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली आहे. इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधानपदाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकत संसदेतून (Parliament) वॉकआऊट केले. त्यामुळे शरीफ यांचा मार्ग मोकळा झाला.

इम्रान खान यांच्याविरोधात विरोधातील अविश्वास प्रस्ताव रविवारी मध्यरात्री १ वाजता मतदान होवून मंजूर झाला आहे. ३४२ सदस्य संख्या असलेल्या पाकिस्तानच्या संसदेत १७२ ही बहुमताची मॅजिक फिगर आहे. यात इम्रान खान यांच्या विरोधात संयुक्त विरोधी पक्षाला १७४ मत पडली. त्यानंतर पंतप्रधानपदासाठी सोमवारी निवडणूक होणार होती.

Shehbaz Sharif
जगनमोहन यांनी अर्धे मंत्रिमंडळ बसवलं घरी; चौदा नवीन चेहऱ्यांना बनवलं मंत्री

शरीफ यांच्याविरोधात इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक पार्टीचा उमेदवारही दिला होता. पण निवडणुकीआधीच त्यांच्या सर्व खासदारांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे शरीफ यांची बिनविरोध निवड झाली. शरीफ हे पाकिस्तानचे 23 वे पंतप्रधान ठरणार आहेत. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे लहान भाऊ आहेत. नवाज शरीफ हे तीनवेळा पंतप्रधान होते.

पाकिस्तानात अशा घडल्या घडामोडी...

इम्रान खान सरकारवरील अविश्वास ठरवावरील मतदानापूर्वी पाकिस्तानच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. काही दिवसांपूर्वी इम्रान खान सरकार धोक्यात आल्याचा दावा केला गेला होता. यानंतर इम्रान खान यांची बलूचिस्तानमधील जम्हूरी वतन या मित्रपक्षाने देखील साथ सोडली. यानंतर पक्षाचे प्रमुख आणि सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाहजान बुग्ती (Shahjan Bugti) यांनी राजीनामा दिला. यानंतर पीएमएलएन पक्षाच्या नेत्या मरियम औरंगजेब यांनी विरोधकांना १७४ खासदारांचे समर्थन असल्याचा दावा केला होता. मतदानाआधी विरोधकांच्या बैठकीत १७७ खासदारांनी हजेरी लावल्याचा दावाही केला जात होता.

Shehbaz Sharif
मलिकांसह अबू आझमी अन् अस्लम शेख यांच्या मतदारसंघात भाजपची 'फिल्डींग'

त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरु झाली होती. यावर ३ एप्रिल रोजी मतदान होणार होते. यात त्यांची सत्ता जाणार, अशीच चर्चा सर्वत्र होती. पण प्रत्यक्षात या ठरावावर कामकाज सुरू झाल्यानंतर असेंब्लीच्या उपसभापतींनी परकीय शक्तींचा वापर करून पाकिस्तानमध्ये राजकीय अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत हा ठराव फेटाळून लावला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानची नॅशनल असेंब्लीच बरखास्त करण्याची शिफारस केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये नव्याने निवडणुका जाहिर होणार होत्या.

मात्र विरोधकांनी इम्रान खान यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. यात न्यायालयाने देखील विरोधकांच्या बाजूने निकाल देत संसद बरखास्तीचा निर्णय रद्द करुन अविश्वास ठरावावर मतदान घेण्याचे आदेश दिले. यानंतर शनिवारी या अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्याचे ठरले. त्यानुसार शनिवारी-रविवारी मध्यरात्री अविश्वास प्रस्तावावर मतदान होवून इम्रान खान सरकारवरील अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला. तर सोमवारी शरीफ यांची पंतप्रधान पदासाठी निवड कऱण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com