पंतप्रधानपद गेल्यानंतर इम्रान खान आक्रमक; मुदतपूर्व निवडणुकांसाठी उतरले रस्त्यावर

संसद बरखास्त करण्यासाठी सरकारला सहा दिवसांची मुदत
Imran Khan
Imran Khan Sarkarnama

इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) पदच्युत पंतप्रधान (Prime Minister) इम्रान खान (Imran Khan) यांनी संसद बरखास्त करून मुदतपूर्व निवडणूक जाहीर करण्याची मागणी आता लावून धरली आहे. यासाठी त्यांनी सरकारला सहा दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत सरकारने निवडणूक जाहीर न केल्यास सगळ्या देशाला घेऊन इस्लामाबादेत धडक मारू, असा थेट धमकीवजा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारनं इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात केलं आहे.

इम्रान खान यांच्या मुदतपूर्व निवडणुकीसाठी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी केलेल्या आवाहनानंतर काल (ता. २५) त्यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये आझादी मोर्चा काढला. या वेळी इम्रान समर्थकांची धरपडक करण्यात आली. यानंतर आज सकाळी इम्रान यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सरकार पाकिस्तानला अराजकतेकडे नेत आहे. या दडपशाहीत आमच्या पक्षाच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने तपास यंत्रणांचा गैरवापर आता थांबवावा.

Imran Khan
लालूंकडून राज्यसभेचं एक तिकीट मुलीला अन् दुसरं कोट्यधीशाला

आमचं आंदोलन दडपून टाकण्यासाठी शाहबाज शरीफ यांचं सरकार छापे आणि अटकसत्र राबवत आहे. आमचा शांततपूर्ण मोर्चा दडपून टाकण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. आमच्या घरांवर छापेही टाकण्यात आले. सरकारने दडपशाही केली तरी आम्ही देशाला मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. सरकारने संसद बरखास्त करून निवडणुका जाहीर कराव्यात, अन्यथा आजपासून सहाव्या दिवसानंतर मी पुन्हा इस्लामाबादला येईन आणि त्यावेळी संपूर्ण देश माझ्यासोबत असेल, असा इशाराही खान यांनी दिला आहे.

Imran Khan
सातही जागा बिनविरोध! आता केवळ विजयाची औपचारिक घोषणा बाकी

इम्रान खान यांच्या मोर्चाच्या पार्श्वभुमीवर इस्लामाबादमध्ये अत्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सरकारने प्रमुख चौकांमध्ये आणि सरकारी इमारतींबाहेर सैनिकांना तैनात केले होते. संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेड लावून नागरिकांची तपासणीही करण्यात येत होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com