पाकिस्ताननं काढली तालिबानची खोड! अफगाणिस्तानवर थेट हवाई हल्ले

पूर्व अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तानी सैन्याने हवाई हल्ले केले.
पाकिस्ताननं काढली तालिबानची खोड! अफगाणिस्तानवर थेट हवाई हल्ले
Afghanistan Protest Sarkarnama

काबूल : पूर्व अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खोस्त आणि कुनार भागात पाकिस्तान (Pakistan) सैन्याने मोठी कारवाई करत हवाई हल्ले केले. या हल्ल्यात अफगाणिस्तानातील 47 जण ठार झाले असून, 22 जण जखणी झाले आहेत. खोस्तच्या ड्यूरंड रेषेजवळ पाकिस्तानने हे हवाई हल्ले केले. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. यावरुन दोन्ही देशांत तणाव वाढला असून, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हल्ल्यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. यात म्हटले की, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या सैनिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तानसह अन्य दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानच्या सुरक्षा चौक्यांवर हल्ले करीत आहेत. या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी हवाई हल्ले करण्यात आले.

Afghanistan Protest
इंधन दरवाढीच्या झळा; देशात सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रात तर स्वस्त पोर्ट ब्लेअरमध्ये!

पाकिस्तानने तालिबानच्या (Taliban) अधिकाऱ्यांना दहशतवाद्याविरोधात कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे. पाकिस्तानच्या या हल्ल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तान सरकारने काबूलमध्ये पाकिस्तानच्या राजदूतांना पाचारण केले. अफगाणिस्तानने पाकिस्तानच्या राजदूतांना याबाबत जाब विचारला आहे. दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच हे हल्ले करण्यात आले, असा दावा पाकिस्तानने केला आहे. परंतु तालिबानने हा दावा फेटाळून लावला आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यांत अफगाणिस्तावर ताबा मिळवल्यानंतर तालिबान सरकारने सीमेवरील दहशतवादी कारवायांना आळा घातल्याचा दावा केला होता.

Afghanistan Protest
भाजपची डोकेदुखी वाढली! बड्या नेत्याच्या विरोेधात हिंदुत्ववादी संघटनाच उतरली मैदानात

दरम्यान, अफगाणिस्तानातील संयुक्त राष्ट्र सहायता मिशनने या हल्ल्याबद्धल खंत व्यक्त केली आहे. खोस्त, कुनार प्रांतातील हवाई हल्ल्यांमुळे महिला आणि लहान मुलांचा बळी गेला असून, या घटनेमुळे संघटना व्यथित झाली असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तेहरिक ए तालिबान ही पश्‍तून दहशतवादी संघटना आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान हा तालिबानच्या विचारसरणीचे पालन करणारा आहे. याबाबत तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले की, पाकिस्तानचे हवाई हल्ले हे अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील वैर वाढवणारे आहेत. युद्ध सुरू झाले तर ते कुणाच्याही हिताचे नसते, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.