कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकार देणार 50 हजारांची नुकसान भरपाई
india records biggest single day covid deaths in world twitter

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकार देणार 50 हजारांची नुकसान भरपाई

या घोषणेमुळे आता नुकसान भरपाई घोषित करणारे उत्तराखंड पंजाबनंतरचे आणखी एक राज्य ठरले आहे.

देहरादून : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकार 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी (Chief Minister Pushkar Singh Dhami) यांनी केली आहे. मुख्यमंत्री निवासमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. उत्तराखंडमध्ये आतापर्यंत 7 हजार 397 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

या घोषणेमुळे आता नुकसान भरपाई घोषित करणारे उत्तराखंड पंजाबनंतरचे आणखी एक राज्य ठरले आहे. कालच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी (cm charanjit channi) यांनी देखील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. पंजाबमध्ये आतापर्यंत 16 हजार 531 जण कोरोनामुळे दगावली आहेत.

22 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली होती माहिती.

कोरोनामुळे दगावलेल्यांच्या नातेवाईकांना मागच्या अनेक दिवसांपासून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत होती. मात्र याबाबतची रक्कम ठरवण्यासाठी तसेच नियमावली बनवण्यासाठी केंद्र सरकारने चालढकल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर केंद्राने 22 सप्टेंबर रोजी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांसाठी 50 हजार रुपयांची भरपाई दिली जाईल, असे स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्राद्वारे दिले होते.

कोरोना मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची भरपाई देण्याची मागणी होत होती. मात्र केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती निवारण निधीतून 50 हजार रुपये सानुग्रह रक्कम दिली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एनडीएमए) कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंसाठी एक्स-ग्रेशिया रकमेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

Related Stories

No stories found.