Karnataka Elections 2023: कर्नाटकात निवडून आलेल्या २२३ पैकी १२२ आमदार कलंकित

Karnataka Elected MLA: 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Karnataka Election 2023:
Karnataka Election 2023: Sarkarnama

122 Karnataka MLAs Tainted: कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता मुख्यमंत्री पदासाठी सध्या रस्सीखेच सुरु असल्याचं चित्र दिसत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR)च्या रिपोर्टनुसार, कर्नाटकात विजयी झालेल्या २२३ आमदारांपैकी 122 म्हणजेच 55 टक्के आमदारांविरोधात फौजदारी खटले दाखल आहेत.2018 च्या विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण 35 टक्के होते, ते 2023 मध्ये 55 टक्क्यांवर पोहोचले. (Out of 223 MLAs elected in Karnataka, 122 are tainted)

अहवालानुसार कर्नाटकमध्ये यंदाच्या निवडणुकीत (Karnatak Elelction 2023) गुन्हेगारी खटले असलेल्या विजयी उमेदवारांची टक्केवारी सर्वात जास्त आहे. रिपोर्टनुसार, 78 विजयी उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. यात काँग्रेसच्या 40 आमदारांवर भाजपच्या 34 आणि जेडीएस (एस)9 आमदारांवर फौजदारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काँग्रेस-भाजपच्या निवडून आलेल्या 122 पैकी 71 उमेदवारांवर बलात्कार आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Karnataka Election 2023:
BJP Political News : पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक; इच्छुकांची जोरदार 'बॅनरबाजी'

मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेले कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार हे या यादीत अव्वल स्थानावर आहेत. महत्त्वाची बाब म्हणजेच शिवकुमार (DK Shivkumar) कर्नाटकातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीत (1431 कोटी) यादीत अव्वल स्थानावर आहेत. डी के शिवकुमार यांच्यावर लाचखोरी आणि खोटी साक्ष देण्यासह 19 फौजदारी खटले दाखल आहेत, तर माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर निवडणुकीत अवाजवी प्रभाव, दंगल आणि घातक शस्त्रे बाळगणे, लाचखोरी सारखे १३ गुन्हे दाखल आहेत. (National Politics)

तसेच, 71 (32%) विजयी उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असल्याची नोंद केली आहे. 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान 221 आमदारांपैकी 54 (24%) आमदारांनी स्वतःविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले होते. यावेळी कलंकित आमदारांचा आकडा 37 टक्क्यांनी वाढला आहे. (Karnatak Election 2023)

Karnataka Election 2023:
Maharashtra BJP : महाराष्ट्र भाजप आव्हानं कशी पेलणार ?

याशिवाय कर्नाटक विधानसभेत महिलांची संख्या कमी आहे. केवळ चार टक्के महिला आमदार म्हणून सभागृहात पोहोचू शकल्या आहेत. यासोबतच अपक्ष आणि प्रादेशिक पक्षांचे 100 टक्के आमदार कोट्यधीश आहेत. तसेच, एक टक्का लोकांकडे 50 लाख ते 2 कोटींच्या दरम्यान मालमत्ता आहे. त्याच वेळी, चार टक्के लोकांकडे 50 लाखांपेक्षा कमी मालमत्ता आहे. यासोबतच 14 टक्के लोकांकडे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि 81 टक्के लोकांकडे 2 कोटी ते 5 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com