Karnataka Election: भाजपने खेळला मोठा डाव; निवडणूक जाहीर होण्याच्या काही तास आधी काँग्रेस मुख्यमंत्र्यांबाबत घेतला हा निर्णय..

Karnataka Assembly Election: मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सकाळी १० वाजता गृहसचिवांना कार्यालयात बोलावून पाच घोटाळ्यांच्या तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्याच्या सूचना दिल्याचे कळते.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 Sarkarnama

बंगळूर : कर्नाटक (Karnataka) विधानसभेच्या निवडणुकीची (Election) तारीख जाहीर होण्याच्या काही तासांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ‘सीआयडी’कडे राज्यात झालेल्या पाच मोठ्या घोटाळ्यांची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सिद्धरामय्या यांच्या सरकारच्या काळात झालेल्या मोठ्या घोटाळ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याच्या कडक सूचना त्यांनी सीआयडीच्या अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. (Order to investigate the scandals of Siddaramaiah's time)

कृषी भाग्य घोटाळ्याने २.१५ लाखांहून अधिक शेतीचे खड्डे बांधून ८०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक, ६.५८ लाख लोक दररोज नाश्ता आणि जेवण घेत असल्याची विश्वासार्ह नोंद करून २१ महिने सतत दर महिन्याला २८ कोटी रुपयांचे अनुदान लुटणाऱ्या इंदिरा कॅन्टीनच्या ग्राहकांचा घोटाळा आदींची चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे समजते.

Karnataka Assembly Election 2023
Solapur NCP News : राष्ट्रवादी नेत्याच्या अंगावर ट्रक घालणारा चालक म्हणतो ‘तो मी नव्हे’च!

भद्रा अप्पर बॅंकमेंट प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत त्रिपुरा आणि मणिपूर राज्य सरकारांच्या मुख्य सचिवांच्या स्वाक्षऱ्यांची कॉपी करून प्रमाणपत्र देऊन विश्‍वेश्‍वरय्या जल निगम लिमिटेडने १५८ कोटी रुपयांचा घोटाळा केला. सूत्रांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी जयनगर व्यापारी संकुलाच्या वाटप घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिथे कायद्याचे उल्लंघन करून आणखी ३१२ दुकाने बांधली गेली आणि प्रत्येक दुकान वाटप करणाऱ्यांकडून ३० लाखांहून अधिक रक्कम घेतली गेली, असाही आरोप आहे.

Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election : कर्नाटकातील भाजप आमदारांना ‘गुजरात मॉडेल’ची चिंता : कुणाचा पत्ता कट होणार.... कुणाला लॉटरी लागणार?

बोम्मईकडून गृहसचिवांना सूचना

बंगळूर दक्षिण जिल्हा भाजप युनिटचे अध्यक्ष एन. आर. रमेश यांनी पत्रकार परिषदेत जारी दिलेल्या कागदपत्रांच्या आधारे हा आदेश दिल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी सकाळी १० वाजता गृहसचिवांना कार्यालयात बोलावून पाच घोटाळ्यांच्या तपासाची जबाबदारी सीआयडीकडे सोपवण्याच्या सूचना दिल्याचे कळते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com