अमित शहांना सरदार पटेल विद्यालयात विरोध

Amit Shah : शहा यांचे वर्तन कायम सरदार पटेल यांच्या आदर्शांच्या विरोधात...
Amit Shah Latest News
Amit Shah Latest Newssarkarnama

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील सरदार पटेल विद्यालयाच्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केल्याबद्दल याच शाळेच्या २०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थ्यांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून जोरदार आक्षेप नोंदवल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

सध्याच्या वातावरणात पटेल यांच्या विचारसरणीच्याच विरोधात असलेल्या शहा यांच्यासारख्या राजकीय नेत्यास येथे निमंत्रित करणे हे या विद्यालयाच्या व शिक्षण संस्थेच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे, असे या पत्रात म्हटले आहे. दरम्यान शहा यांनी नियोजित कार्यक्रमानुसार आज शाळेला भेट देऊन सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या कार्यक्रमास संबोधित केले. (Amit Shah Latest News)

Amit Shah Latest News
इम्रान खान यांची मुलाखत घ्यायला गेलेल्या महिला पत्रकाराचा रॅलीत मृत्यू ; घटना घडलीच कशी?

शहा यांनी 'राष्ट्रीय एकता दिना'निमित्त मेजर ध्यानचंद स्टेडियम येथून ‘रन फॉर युनिटी‘ला हिरवा झेंडा दाखवला आणि उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथही दिली. लोधी इस्टेट भागातील सरदार पटेल विद्यालय ही राजधानी दिल्लीतील अत्यंत प्रतिष्ठित शाळांत गणली जाते. येथे प्रवेश मिळविण्यासाठी पालकांना ‘दिव्य' करावे लागते असा अनुभव आहे.

गुजरात एज्युकेशन सोसायटीच्या या शाळेच्या व्यवस्थापनावर सुरूवातीपासून गुजराती भाषिकांचे वर्चस्व आहे. भाजपचे माजी खासदार हरेन पाठक यांच्या गटाचे दीर्घकाळ वर्चस्व येथे होते. या पार्श्वभूमीवर शहा यांना बोलावताच शाळेच्याच २३७ माजी विद्यार्थ्यांनी कडाडून विरोध करणे ही लक्षणीय घटना मानली जाते.

या माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सध्याच्या 'ध्रुवीकरणाच्या‘ वातावरणात शहा यांना येथे निमंत्रित करणे शाळेच्या तत्त्वांच्याच विरोधात आहे. त्यांना निमंत्रण दिल्याने शाळा टीकेचे केंद्र बनेल, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या पत्रात स्पष्ट म्हटले म्हटले आहे की शहा यांच्यासारख्या राजकारण्याला बोलावणे शाळेला टीकेचे धनी बनविण्यासारखे आहे. ज्या शिक्षणसंस्थेच्या मूळ तत्वांतच राज्यघटना व बहुलवादावर भर दिला आहे. तेथे शहा यांना बोलावल्याने याच तत्त्वांनाही धक्का बसेल.

Amit Shah Latest News
Sangali : केंद्राच्या लुडबुडीमुळे साखर कारखाने अडचणीत... अरुण लाड

पत्रात पुढे म्हटले आहे की, “आम्ही अशा शाळेत आहोत जी प्रश्न विचारण्यास, मतभेद व्यक्त करण्यास, युक्तिवाद आणि वादविवादाच्या लोकशाही आदर्शांना प्रोत्साहन देते. याच शाळेने आम्हाला प्रदान केलेल्या व लोकशाहीबद्दलच्या अतूट बांधिलकीतून हे पत्र आम्ही लिहित आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय आघाडी असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून शहा यांचे वर्तन कायम सरदार पटेल यांच्या आदर्शांच्या विरोधात राहिले आहे.‘‘

दरम्यान, शहा यांनी सरदार पटेल जयंतीनिमित्त या शाळेत आयोजित कार्यक्रमाला ठरल्यानुसार आज सकाळी संबोधित केले. सरदार पटेल यांच्याशिवाय अखंड भारताची कल्पनाच करता येणार नाही असे सांगून ते म्हणाले की पटेल देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर आज देशासमोरील बहुतांश समस्या निर्माण झाल्या नसत्या असे सर्वसामान्यांचे मत आहे.

‘अमूल' उद्योगाची मूळ कल्पनाही सरदार पटेल यांचीच होती. हा उद्योग आज दरवर्षी गुजरातमधील ३६ लाख भगिनींना रोजगार देतो. सहकार चळवळ जमिनीशी जोडण्याचे श्रेय सरदार पटेल यांनाच जाते असेही शहा (Amit Shah) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com