Budget Session 2023 : 'मोदी-अदानी भाई-भाई'चा विरोधकांचा नारा

Narendra Modi : राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळात मोदींचं भाषण सुरूच
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama

Budget session : राज्यसभेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राष्ट्रपतींच्या अभिषाणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलत होते. त्यावेळी विरोधक 'मोदी-अदानी भाई-भाई' असा नारा देत होते. या गदोरोळातच पंतप्रधान यांनी विरोधकांना टोले मारत प्रत्युत्तर दिलं. त्यामुळं राज्यसभेत एकीकडे विरोधकांचा गोंधळ तर दुसरीकडे मोदींचं भाषण, असं चित्र पहायला मिळालं.

सोल्यूशनला प्राधान्य

यावेळी मोदी यांनी तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करून देशातील अनेक समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर केंद्र सरकारने (Central Goverment) भर दिल्याचं सांगितले. एका समस्या हातात घेऊन तिचं निराकरण न करता सोडून दिली नाही. तर त्यावर योग्य उपाय शोधून ती समस्या मार्गी लावली. परिणामी देशात आमच्या कामांमुळे आमची ओळख निर्माण झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. तसेचं विरोधक जेवढा चिखलफेक करतील तेवढंच कमळ जास्त फुलेल असा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

Narendra Modi
Ajit Pawar : प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्यानंतर अजित पवार संतापले; शिंदे,फडणवीसांना म्हणाले...

११ कोटी घरांना नळपाणी

पुढे बोलताना मोदी (Narendra Modi) म्हणाले की, आमचं सरकार येण्यापूर्वी ३ कोटी घरांना नळपाणी मिळत होतं. आता ११ कोटी घरांना पाणी मिळतं. बँकेच्या राष्ट्रीयकरण करताना गरीबांना मदत होईल असा बाहाणा दिला होता. मात्र अनेक गरीबांना बँकेचे तोंडही पाहता आलं नाही. आम्ही जनधन योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील ३२ कोटी नागरिकांचे बँक खाते उघडण्यास मदत केली.

Narendra Modi
Eknath Shinde News : मुख्यमंत्री शिंदेंचे वाढदिवसाच्या दिवशीच राज्यातील जनतेला मोठ गिफ्ट

या त्रीशक्तीतून विकासाला गती

जनधन, आधार आणि मोबाईल ही विकासाची त्रीशक्ती आहे. या त्रीशक्तीचा वापर करून विविध योजनांच्या माध्यामातून देशातील गरजू नागरिकांना २७ लाख कोटींचा फायदा झाला. त्यांच्या बँक खात्यात थेट लाभाची रक्कम जमा झाली. त्यामुळं कोणाला काही खाता आलं नाही. त्यामुळं लोक गोंधळ घालणारच, असे म्हणत मोदींनी विरोधकांना पुन्हा टोमणा मारला.

Narendra Modi
Praful Patel News : राष्ट्रवादीला धक्का! शरद पवारांचे विश्वासू प्रफुल्ल पटेलांवर ईडीची मोठी कारवाई

अटकाना, लटकाना भटकाना कार्यसंस्कृती उलथवली

यापूर्वी आपल्या देशात योजनांबाबत अटकाना, लटकाना भटकाना अशी कार्यसंस्कृती होती. त्यातून इमानदार ट्रॅक्स दात्यांचे नुकसान होत होते. आम्ही येताच टेक्नॉलॉजीचा फ्लटफॉर्म तयार केला. सोळाशे स्तरावर माहितीच्या आधारे इन्फ्रास्ट्रक्चला गती देण्याचं काम होत आहे.

ज्या योजनांना यापूर्वी काही महिने लागायचे ते प्रकल्प आता काही आठवड्यातच मार्गी लावले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग करून कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहितीही मोदी यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com