विरोधी पक्षांची सगळी भिस्त आता राष्ट्रपतींवरच!

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
opposition parties will meet president today on agriculture bills issue
opposition parties will meet president today on agriculture bills issue

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावर राज्यसभा आणि लोकसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. या मुद्द्यावर आता सर्वच पक्ष भाजप सरकारच्या विरोधात जात असल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षांच्या सुमारे शंभर खासदारांना आज संसद परिसरात मूक निषेधयात्रा काढली. आता विरोध पक्ष राष्ट्रपतींना साकडे घालणार आहेत. आता विरोधी पक्षांची सगळी भिस्त आता राष्ट्रपतींवरच आहे. 

राज्यसभेत मंजूर केलेल्या कृषी विधेयकांना विरोध करीत संसद अधिवेशनावर बहिष्कार टाकणार्‍या राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या सुमारे शंभर खासदारांनी आज संसदेच्या आवारातील महात्मा गांधी पुतळा ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या परिसरात मूक पदयात्रा काढली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज सायंकाळी पाच वाजता भेटून या कायद्यांवर स्वाक्षरी न करता ते राज्यसभेकडे परत पाठवावेत, असे साकडे विरोधी पक्षीय खासदार घालणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

या वेळी बोलताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, खासदारांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून बहिष्कार टाकल्याचा सरकारचा दावा खोटा आहे. निलंबन मागे घेण्याची आमची प्रमुख मागणी नाही. वादग्रस्त विधेयके संपूर्णपणे मागे घेणे व स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना कृषी उत्पादनाबद्दल योग्य किंमत मिळण्याची खात्री देणे, खासगी कंपन्या शेतकऱ्यांचा शेतमाल एमएसपीच्या पेक्षा कमी किमतीत विकत घेणार नाहीत , अशी तरतूद असलेले नवीन विधेयक मांडणे आणि किमान हमी मूल्य म्हणजेच एमएसपीला धक्का न लावणे, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. 

आझाद यांच्या दालनात राज्यसभा कामकाजावर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर सर्व विरोधी पक्षीय खासदार महात्मा संसदेतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जमले. त्यांच्या हातात 'किसान बचाव'  यासारखे फलक विविध भाषांमध्ये लिहिलेले होते. आझाद, पटेल, डेरेक ओब्रायन, तिरूची सिवा, रामगोपाल यादव,, ए करीम, केके रागेश, आनंद शर्मा ,राजीव सातव, वंदना चव्हाण, फौजिया खान, कुमार केतकर आधी खासदार पुतळ्यापासून पदयात्रेने आकारांच्या पुतळ्याजवळ गेले आणि तेथून माघारी फिरले. यावेळी घोषणाबाजी कटाक्षाने टाळण्यात आली होती आणि सर्वजण मूकपणे चालत होते. 

समाजवादी पक्ष (सपा), राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी), द्रमुक, तृणमूल काँग्रेस (टीएमसी), आम आदमी पक्ष (आप), माकप आणि भाकप, राष्ट्रीय जनता दल, टीआरएस आदी पक्षनेते यात सामील झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com