
नवी दिल्ली : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा (Vice President Election) उमेदवार विरोधीपक्षांनी जाहीर केला आहे. काँग्रेसच्या (Congress) जेष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गारेट अल्वा यांच्या नावाची घोषणा केली. मार्गारेट अल्वा या राज्यस्थान, गोव्याच्या राज्यपाल होत्या. अल्वा या मूळच्या कर्नाटकातील आहेत. (Margaret Alva Latest Marathi News)
विरोधी पक्षांची शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी बैठक झाली. या बैठकीनंतर पवार म्हणाले की, मार्गारेट अल्वा विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील. 19 जुलै रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विरोधी उमेदवाराला आतापर्यंत 17 पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आम्ही विरोधकांसोबत असल्याचे शिवसेनेने सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, या निवडणुकीत विरोधक एकवटले आहेत.
कोण आहेत मार्गारेट अल्वा?
अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकातच शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मार्गारेट या काँग्रेस पक्षात सामील झाल्या. काँग्रेसने त्यांना राज्यसभेवर पाठवले. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. काँग्रेसने त्यांना 1975 मध्ये पक्षाचे सरचिटणीस केले. अल्वा या चार वेळा राज्यसभेच्या सदस्य होत्या. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळी एनडीएने देखील उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकड यांच्या नावाची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत धनकड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.